BK00909
New product
श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांचे आत्मकथन
Warning: Last items in stock!
Availability date:
Santulan Yuge Yuge
श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांचे आत्मकथन
Recipient :
* Required fields
or Cancel
हे चरित्र म्हणजे केवळ आत्मचरित्र नव्हे; तर ही संतुलनाची गोष्ट आहे!
परमेश्वरी तत्त्व नित्य असतं पण अवताररूपात ‘सम्भवामि युगे युगे’ ही प्रतिज्ञा सत्य करतं, तसंच हे संतुलन अनादि आहे. सृष्टीच्या प्रारंभीसुद्धा माया होती आणि परमात्मा होता, आदिशक्ती होती आणि संकल्पनास्वरूप परमतत्त्व होतं. म्हणूनच युगानुयुगे चालत आलेल्या या संतुलनाची गोष्ट सर्वांना सांगन्यासाठीचे हे या लेखन.
श्री गुरुजी जन्माला आले आणि जीवनात त्यांना जे जे काही करता आलं, त्यांना जे काही आध्यात्मिक अनुभव आले, साक्षात दर्शनं झाली, वेळोवेळी देव मदतीला धावून आला असे सर्व अनुभव श्री गुरुजी या लेखनातून सुहृदांना सांगतात.
त्याचप्रमाणे परमेश्वराचं कार्य करण्याच्या उद्देशानेच आपण जन्म घेऊन इथे आलेलो आहोत याचं भान सर्वांना यावं, सर्वांनी अशा परमेश्वरी योजनेप्रमाणे जनता-जनार्दनासाठी काही ना काही करण्याची प्रेरणा घ्यावी, हाही या आत्मचरित्राचा एक उद्देश आहे.
श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे :
जगप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य, आध्यात्मिक गुरू श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांनी भारतीय परंपरा आणि वेद, आयुर्वेद, पुराणे, योग, ज्योतिष, संगीत याविषयांवर संशोधन करून जीवनाची विविध अंगे समृद्ध करण्यासाठी त्याचा उपयोग केला.
१९४०मध्ये बडोदा येथे जन्मलेल्या श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे व आयुर्वेदाचे शिक्षण पूर्ण केले. आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे, त्यांनी स्वत:च्या संशोधनाने व प्रयोगांनी सर्वंकष पंचकर्म उपचार पद्धतीचे तंत्र पक्के करून गेल्या काही शतकांपासून लुप्त होत चाललेल्या परंपरांचे, आयुर्वेदिक पंचकर्मांचे पुनरुज्जीवन केले.
संतुलन पंचकर्म उपचार पद्धतीत शरीरातील पाच तत्त्वांचे शुद्धीकरण योग, प्राणायाम, ध्यान आणि संगीतउपचार यांच्याशी जोडले.
श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांनी १९८२मध्ये कार्ला येथे शांत, स्वच्छ, आध्यात्मिक वातावरण असलेल्या 'आत्मसंतुलन व्हिलेज'ची स्थापना केली. आत्म्याचे संतुलन करणारी जीवनपद्धती त्यांनी विकसित केली. येथे त्यांनी स्थापन केलेले जगातील एकमेव ॐकाराचे मंदिर आहे. संतुलन क्रिया योग-योगाचा एक सोपा प्रकार आणि संतुलन ॐध्यान-अंतर्ज्ञान 'अनलॉक' करण्यासाठी एक संक्षिप्त 'दैनिक ध्यान' कार्यक्रमाद्वारे भारतीय संस्कृतीचे 'डीकोडिंग' सगळ्यांसाठी उपलब्ध करून दिले.
आत्मसंतुलनमध्ये FDA आणि GMP मान्यता प्राप्त दोन फार्मसी आहेत. जिथे 200 पेक्षा जास्त औषधे तयार केली जातात. क्लिनिक-कम-स्टोअर्स अशा स्वरूपात केंद्राची शाखा पुणे, कोल्हापूर, मुंबई, नाशिक आणिअहमदाबाद येथे आहे.
श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांनी १९९४मध्ये जर्मनीतल्या स्टुटगार्टजवळ ग्लायशेन येथे Aum-Kurzentrum हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील पहिले आयुर्वेदिक केंद्र स्थापन केले. आयुर्वेदाच्या प्रचार, प्रसारासाठी गेली ४० वर्षे त्यांनी श्रीमद्भगवद गीता, रामायण, स्वास्थ्य संगीत अशा अनेक विषयांवर भारतातच नव्हे तर परदेशातही कार्यक्रम केले तसेच भारतातील आणि परदेशातील अनेक आघाडीच्या वृत्तपत्रे आणि नियतकालिकांतून नियमितपणे लेखन केले .
'साम मराठी' या वाहिनीवर श्री गीतयोग्य शोध ब्रह्मविद्येचा या कार्यक्रमात श्रीमद भगवद गीतेच्या श्लोकांचे निरूपण केले.
श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांना आजवर मिळालेले देश-विदेशातील सन्मान :
२०२२ मध्ये भारत सरकारतर्फे 'पद्म श्री' पुरस्कार
'रेकग्निशन ऑफ एक्सलन्स इन हेल्थ ' केअरसाठी 'आयएमएम'ची ट्रॉफी
आयुर्वेदाची जपणूक आणि विकासासाठीचा 'प्रियदर्शनी पुरस्कार'
पीईएस सोसायटीचा 'शंकरराव कानिटकर पुरस्कार'
आयुर्वेदातील भरीव कार्यासाठी पुणे, पिंपरी महानगर पालिकेच्या महापौरांकडून मानपत्र देऊन सन्मान
श्री गजानन महाराज शिक्षक प्रसारक मंडळातर्फे 'सत्यशोधक समाजभूषण पुरस्कार २००६'
'तथागत आयुर्वेद रिसर्च फौंडेशन'तर्फे आयुर्वेद भूषण पुरस्कार
आयुर्वेदातील भरीव कार्याबद्दल 'इंडो यूएस कॉन्क्लेव्ह'मध्ये पुरस्कार, २०११
अभिप्राय :
गुरुजींनी केलेल्या कार्याचा मी सहज विचार करतो, त्यावेळी मला जाणवते एका व्यक्तीमध्ये इतक्या गुणांना समुच्चय कसा काय; असू शकतो. ते विलक्षण प्रभावी व्यक्तिमत्त्व होते. भौतिक आणि आध्यात्मिक यांचे संतुलन साधत त्यांनी संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनाला योग्य आकार दिला. त्यांनी निर्माण केलेले ओंकाराचे मंदिर अलौकिक आहे. याठिकाणी मिळणारी ऊर्जा वर्णनातीत आहे. गुरुजींनी आपली आध्यात्मिक, सांस्कृतिक, आयुर्वेदिक परंपरा परदेशातही रुजविली आहे.
– अभिजीत पवार, व्यवस्थापकीय संचालक, सकाळ माध्यम समूह, चेअरमन, एपी ग्लोबाले
बाबांचा जगण्याचा आवाका, वेग, झपाटा हा अतिप्रचंड होता. एका जन्मात त्यांनी सात जन्मांचं कर्तृत्व गाजवलं. त्यांनी प्रचंड लिखाण केलं. धर्मग्रंथ त्यांना मुखोद्रत होते. धर्मग्रंथांची सांगड आजच्या जगण्याशी घालण्याचं काम त्यांनी केलं. आयुर्वेदाप्रमाणेच रामायण, महाभारत श्रीमद्भगवद्गीता यांवर त्यांचा सखोल अभ्यास होता. बाबांनी, शंभरी पार केली असती तर अजून खूप मोठं काम ते निर्माण करू शकले असते, असं आजही वाटतं.
– सुनील तांबे, आत्मसंतुलन व्हिलेज, कार्ला
पद्म श्री श्रीगुरू बालाजी तांबे आणि माझा वैयक्तिकरित्या घनिष्ठ संबंध होता. 'भगवद्गीते'चा अर्थ ज्यांना खऱ्या अर्थाने कळला, असे ते व्यक्तिमत्त्व! आरोग्याच्या माध्यमातून मानवी कल्याणासाठी सुख, समाधान, शांती लाभावी, याला अनुषंगाने निर्मळ मनाने आणि निःस्वार्थ बुद्धीने पुढील अनेक वर्षं समाजाची सेवा घडावी, असे कार्य त्यांनी आयुष्यभर केले. श्रीगुरू बालाजी तांबे यांचे संपूर्ण जीवन हे एक आदर्शवत जीवन होते.
– डॉ. विश्वनाथ कराड, संस्थापक अध्यक्ष, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी
'आत्मसंतुलन'मधील उपचारात पंचतत्त्वांच्या शुद्धीद्वारे केवळ शरीराचे नाही, तर मन तसेच आत्म्याच्या संतुलनाचेही सामर्थ्य आहे, असे ते नेहमी म्हणत. आणि त्यादृष्टीने त्यांच्या केंद्रात योग, स्वास्थ्यसंगीत, ॐकार ध्यानाचाही समावेश केलेला असतो. मंदिरात उपासनेच्या वेळी त्यांनी गायलेला ॐकार माझ्या कानात अजूनही घुमतो आहे.
– डॉ. विजय भटकर
Publisher | Sakal Prakashan |
Author | ShreeGuru Dr. Balaji Tambe |
Language | Marathi |
ISBN | 978-81-971884-7-3 |
Binding | Hardcover + Jacket |
Pages | 574 + 32 |
Publication Year | 11/05/2024 |
Dimensions | 6.14 x 9.21 |