New Reduced price! Chhatrapati Sambhaji : Jeevan Ani Balidan

Chhatrapati Sambhaji : Jeevan Ani Balidan

BK00820

New product

  • 'लाईफ अँड डेथ ऑफ संभाजी' या मेधा देशमुख-भास्करन लिखित इंग्रजी कादंबरीचा मराठी अनुवाद छत्रपती संभाजी : जीवन आणि बलिदान 
  • 'स्वराज्या'चे स्वप्न उराशी बाळगून ते साकार करण्यासाठी संघर्ष करणाऱ्या छत्रपती शिवाजीमहाराजांच्या छत्रछायेत वाढलेल्या शंभूराजांच्या जडणघडणीचा हा प्रवास...

More details

₹ 449 tax incl.

-25%

₹ 599 tax incl.

More Info

  • 'अपराजित योद्धा', 'मृत्युंजय' अशी ऐतिहासिक प्रतिमा असलेल्या शंभूराजांना उणेपुराणे ३२ वर्षांचे आयुष्य लाभले...
  • त्यात आईविना हरवलेले बालपण... कोवळ्या वयात स्वीकारावी लागलेली मोगलांची मनसबदारी... आग्र्यातील सुटकेनंतर मथुरेत राहताना वाट्याला आलेले एकाकीपण... अशा कितीतरी अघटित, असामान्य घटना शंभूराजांच्याबाबत घडल्या! अगदी लहान वयातच ते मराठा व मोगलांच्या संघर्षात ओढले गेले.
  • त्यांचे 'युवराज'पद हेही गृहकलह आणि अष्टप्रधानमंडळाचा विरोध यांमुळे काटेरी मुकुटच ठरले...
  • शिवाजीमहाराजांच्या अकाली मृत्यूनंतर मोगल साम्राज्यातील सर्वांत क्रूर बादशहा औरंगजेब लाखो गुलाम आणि करोडोंच्या खजिन्यासह स्वराज्यावर चालून आला. तब्बल नऊ वर्षे शंभूराजांनी औंरंगजेब, इंग्रज, पोर्तुगीज, सिद्दी, डच, फ्रेंच यांच्याशी लढा दिला.  
  • छत्रपती शिवाजीमहाराजांनाही अशा तऱ्हेने प्रचंड मोठ्या मोगल सैन्याशी लढण्याची वेळ आली नव्हती...
  • इतिहासाने संभाजीराजांवर अन्याय केला... परंतु शंभूराजांनी मराठा योद्ध्यांच्या अनेक पिढ्यांमध्ये स्वातंत्र्याचे स्फुल्लिंग पेटत ठेवले, हे नाकारता येणार नाही.
  • संभाजीराजांच्या व्यामिश्र व्यक्तिमत्त्वाचे भावनिक तसेच तत्कालीन ऐतिहासिक, राजकीय संदर्भ मांडणारी कादंबरी!

लेखकाविषयी माहिती : लेखिका मेधा देशमुख-भास्करन या सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ आहेत. त्यांनी भारत, जर्मनी व युनायटेड अरब एमिरेट्समधील अन्न व औषध कंपन्यांच्या व्यापार व विक्री विभागात काम केलेले आहे. भारत व गल्फमधील प्रसिद्ध वृत्तपत्रांमध्ये त्यांनी वैद्यकीय क्षेत्रासंबंधी विपुल लेखन केले आहे.
मेधा देशमुख यांचे छत्रपती शिवाजीमहाराजांचे चरित्र असलेले ‘चॅलेंजिंग डेस्टिनी’ हे पहिले इंग्रजी पुस्तक आहे. या पुस्तकाला 'रेमंड क्रॉसवर्ड बुक'तर्फे चरित्र लेखनासाठी असलेले मानांकन मिळाले होते. ‘प्रिस्किप्श्‍न ऑफ लाईफ’ हे औषध निर्मिती व वैद्यकशास्त्रावरील पुस्तकही प्रकाशित झाले आहे. त्याचबरोबर 'द स्टोरी ऑफ इम्युनिटी' आणि ‘अप अगेन्ट डार्कनेस’ ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. 

Features

PublisherSakal Prakashan
AuthorMedha Deshmukh - Bhaskaran
LanguageMarathi
ISBN978-81-970578-2-3
BindingPaperback
Pages468
Publication Year2024
Dimensions5.5 x 8.5

Reviews

Write a review

Chhatrapati Sambhaji : Jeevan Ani Balidan

Chhatrapati Sambhaji : Jeevan Ani Balidan

  • 'लाईफ अँड डेथ ऑफ संभाजी' या मेधा देशमुख-भास्करन लिखित इंग्रजी कादंबरीचा मराठी अनुवाद छत्रपती संभाजी : जीवन आणि बलिदान 
  • 'स्वराज्या'चे स्वप्न उराशी बाळगून ते साकार करण्यासाठी संघर्ष करणाऱ्या छत्रपती शिवाजीमहाराजांच्या छत्रछायेत वाढलेल्या शंभूराजांच्या जडणघडणीचा हा प्रवास...