Career FAQs

BK00904

New product

प्रा. विजय नवले यांचे 'करिअर FAQs' हे पुस्तक म्हणजे प्रश्नोत्तराच्या स्वरूपात करिअरविषयक मार्गदर्शन आहे.

More details

₹ 299 tax incl.

More Info

 मुलं आठवी-नववीत गेली की घरोघरी करिअरविषयक चर्चा सुरू होतात. विद्यार्थी, पालकांना काय शिक्षण घ्यावं, कुठल्या करिअरला स्कोप आहे असे एक ना अनेक प्रश्न पडलेले असतात. या प्रश्नांची योग्य उत्तरे मिळाली की मुलांच्या करिअरला योग्य दिशा मिळायला मदत होते. दहावी, बारावीनंतरचे कोर्सेस, परीक्षा, पदव्या, त्यासाठी असणाऱ्या प्रवेश परीक्षा या सगळ्याची माहिती या पुस्तकात वाचायला मिळेल. मुलांच्या करिअरची चर्चा घरात सुरू होण्यापूर्वीही हे पुस्तक वाचलं तर कदाचित पालकांना आपल्या मुलांच्या क्षमता ओळखता येतील, त्यानुसार त्यांना दिशा देता येईल. तसेच ९वी, १०वीच्या मुलांनीही हे पुस्तक वाचले तर त्यांनाही आपल्याला आवडणारे विषय नीटपणे लक्षात येतील, आपल्याला नक्की काय करायचं आहे हे कळायला मदत होईल. त्यामुळे सर्व पालक आणि मुलांसाठी हे पुस्तक नक्कीच उपयोगाचे आहे.

लेखकाविषयी :
प्रा. विजय नवले गेली २५ वर्षे अध्यापन, करियर मार्गदर्शन, व्यक्तिमत्त्व विकास, शैक्षणिक उपक्रम, कौशल्य विकसन, उद्योजकता विकास क्षेत्रात कार्यरत आहेत. अभियांत्रिकी, व्यवस्थापन, करिअर आदी विषयांवर त्यांनी २४ पुस्तकांचे लेखन केले आहे. सकाळ, लोकमत, पुढारी, प्रभात, सामना, टाइम्स ऑफ इंडिया आदी वर्तमानपत्रांमधून त्यांनी करिअरविषयक विपुल लेखन केले आहे.

Features

PublisherSakal Prakashan
AuthorProf. Vijay Navale
LanguageMarathi
ISBN978-81-971884-2-8
BindingPaperback
Pages216
Publication Year2024-05-18
Dimensions5.5 x 8.5

Reviews

Write a review

Career FAQs

Career FAQs

प्रा. विजय नवले यांचे 'करिअर FAQs' हे पुस्तक म्हणजे प्रश्नोत्तराच्या स्वरूपात करिअरविषयक मार्गदर्शन आहे.