BK00809
New product
कवी गोविंद अनंत कुळकर्णी यांनी त्यांच्या आयुष्यात जे अनुभवले ते त्यांनी काव्यरूपात मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न ‘नेत्र हवे मज’ या काव्यसंग्रहातून केला आहे.
Warning: Last items in stock!
Availability date:
Netra Have Maj
कवी गोविंद अनंत कुळकर्णी यांनी त्यांच्या आयुष्यात जे अनुभवले ते त्यांनी काव्यरूपात मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न ‘नेत्र हवे मज’ या काव्यसंग्रहातून केला आहे.
Recipient :
* Required fields
or Cancel
हा काव्यसंग्रह शब्दबद्ध करताना त्यांनी निसर्ग, मानवी भाव-भावना, प्रेम, निरागसता, सूर्य, आभाळ, सृष्टी, दृष्टी, आभाळ, नियती, पक्षी यांसारखे विविध विषय त्यांच्या कवितेतून सोप्या भाषेत मांडले आहेत. त्याचबरोबर आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर स्वतःशी आणि इतरांशी होणारा संवाद, विसंवाद कवितेतून सहज मांडण्याचा प्रयत्न केला आहे. भावनांनी ओतप्रोत भरलेल्या या कविता वाचकांना नक्कीच आवडतील यात शंका नाही.
कवीविषयी :
कवी गोविंद कुळकर्णी यांनी ग्रंथपाल म्हणून ३६ वर्षांहून अधिक काळ मुंबईत ‘चेंबूर एज्युकेशन सोसायटी’ मध्ये नोकरी केली. मुंबई माध्यमिक शाळा ग्रंथपाल संघटनेत त्यांनी उपाध्यक्ष म्हणून काम केले. मूळचे रत्नागिरीतील असून सध्या ते मुंबईत राहत आहेत. वाचन, लेखन, नाटक, लोककला पाहणे हे त्यांचे छंद असून ‘कोकणातील पारंपरिक खेळे’ हे त्यांचे पुस्तक प्रकाशित आहे. विविध नियतकालिके, मासिके यांमध्ये त्यांनी सातत्याने लिखाण केले आहे.
Publisher | Sakal Prakashan |
Author | Govind Anant Kulkarni |
Language | Marathi |
ISBN | 978-81-968004-4-4 |
Binding | Paperback |
Pages | 132 |
Publication Year | 2024-05-21 |
Dimensions | 5.5 x 8.5 |