BK00666
New product
सकाळ प्रकाशनाने सप्टेंबर, २०२२मध्ये घेतलेल्या लेखनस्पर्धेत 'कथा' या साहित्यप्रकारासाठी पुरस्कृत केले गेलेले सुजय जाधव लिखित पुस्तक जिब्रिश कथा.
Warning: Last items in stock!
Availability date:
Gibberish Katha
सकाळ प्रकाशनाने सप्टेंबर, २०२२मध्ये घेतलेल्या लेखनस्पर्धेत 'कथा' या साहित्यप्रकारासाठी पुरस्कृत केले गेलेले सुजय जाधव लिखित पुस्तक जिब्रिश कथा.
Recipient :
* Required fields
or Cancel
जिब्रिश (Gibberish) म्हणजे बाष्कळ, ज्याचा अर्थ लागणार नाही, असं काहीसं. ओळखीच्या जगाचा संदर्भ सोडून नवनवे अपरिचित प्रदेश धुंडाळणाऱ्या या कथांच्या प्रवृत्तीसाठी हे सूचक नाव आहे...
कथांचं लॉजिक हे वास्तवाशी फारकत घेणारं, मुक्त रचनेला कवटाळणारं, आणि संकल्पनेच्या पातळीवर कथेच्या मांडणीशी खेळणारं आहे... सायन्स फिक्शन, फॅन्टसी, मॅजिक रिअलिझम, भाषिक चमत्कृतीशी खेळणाऱ्या कथा, विडंबन, अशा अनेक प्रकारांमधे 'जिब्रिश कथा' लीलया वावरत असतात...
या लहानशा कथासंग्रहातही सुजयची लेखक म्हणून रेंज लक्षात येते. वाचणाऱ्यांनाही ती नक्कीच त्यांच्या ओळखीच्या प्रदेशापलीकडल्या नव्या जागा दाखवेल.
लेखकाविषयी :
लेखक, कवी, गीतकार, चित्रकार आणि रॅपर, अशी चतुरस्र ओळख
कथालेखनात सातत्याने विविध प्रयोग
आकाशवाणीसाठी श्रुतिकालेखन
‘प्रभात’ वृत्तपत्रासाठी ललितलेखन
‘चिठ्ठी’ सिनेमासाठी कथा-पटकथा-संवादलेखन
‘लुज कंट्रोल’ या सिनेमासाठी गीतलेखन
‘हायपरबोला’, ‘तोडी मिल फँटसी’ ही नाटके प्रदर्शित
‘सुजय जिब्रिश’ या नावाने रॅप गाणी आणि परफॉर्मन्सेस
‘माझ्याशी नीट बोलायचं’ या ‘भाडिपा’सोबत कोलॅबोरेशनमध्ये केलेल्या गाण्याला पाच लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज
Publisher | Sakal Prakashan |
Author | Sujay Jadhav |
Language | Marathi |
ISBN | 978-81-971884-1-1 |
Binding | Paperback |
Pages | 136 |
Publication Year | 2024-05-25 |
Dimensions | 5.5 x 8.5 |