BK00811
New product
अरुंधती लोंढे लिखित ‘च’ कशाचा? हा ललितलेखसंग्रह असून, यात विविध सामाजिक, राजकीय, परिस्थितीवर व्यंगात्मक भाष्य करणारे लेख आहेत.
Warning: Last items in stock!
Availability date:
'Cha' Kashacha
अरुंधती लोंढे लिखित ‘च’ कशाचा? हा ललितलेखसंग्रह असून, यात विविध सामाजिक, राजकीय, परिस्थितीवर व्यंगात्मक भाष्य करणारे लेख आहेत.
Recipient :
* Required fields
or Cancel
लेखिका या पुस्तकाच्या माध्यमातून सहजच जाता जाता व्यवस्थेवर प्रश्नांचे ओरखडे ओढतात. आयुष्य म्हणजे इच्छा. इतक्या सोप्या भाषेत लेखिका त्यांचे आयुष्याबद्दलचे आकलन या पुस्तकात मांडतात. या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण जो प्रयत्न करतो, जगण्याच्या स्पर्धेचा नकळत आपण एक भाग होतो, तो तटस्थपणे या पुस्तकातून मांडण्याचा लेखिका अरुंधती लोंढे प्रयत्न करतात. मनाची मशागत होण्याकरिता केलेलं हे वैविध्यपूर्ण लिखाण वाचकांच्या मनात नक्कीच जागा निर्माण करून वाचकांच्या मनाचीही मशागत करायला मदत करेल यात शंका नाही.
लेखिकेविषयी :
अरूंधती लोंढे यांचे शिक्षण बी फार्म, एमबीए झाले असून, सध्या त्या अध्यापन क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘ऐक्य’ या दैनिकात त्या ‘मशागत’ या नावाचे सदर गेल्या काही वर्षांपासून लिहीत आहेत. विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्याचा देखील अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. कथा, कविताही त्या सातत्याने लिहीत असतात. दैनिक सकाळसह विविध मासिकांमधून त्यांचे लिखाण प्रसिद्ध झाले आहे.
Publisher | Sakal Prakashan |
Author | Arundhati Londhe |
Language | Marathi |
ISBN | 978-81-973384-9-6 |
Binding | Paperback |
Pages | 106 |
Publication Year | 11/06/2024 |
Dimensions | 5.5 x 8.5 |