BK00821
New product
बाजीरावांसारखा लढवय्या, शूर आणि स्वाभिमानी आदर्श पुढील पिढ्यांना खूप स्फूर्तिदायक ठरू शकतो, याचा विचार करून थोरल्या बाजीरावांचे कार्यचरित्र या पुस्तकात वर्णिले आहे.
Warning: Last items in stock!
Availability date:
Ajinkya Yoddha Thorle Bajirao
बाजीरावांसारखा लढवय्या, शूर आणि स्वाभिमानी आदर्श पुढील पिढ्यांना खूप स्फूर्तिदायक ठरू शकतो, याचा विचार करून थोरल्या बाजीरावांचे कार्यचरित्र या पुस्तकात वर्णिले आहे.
Recipient :
* Required fields
or Cancel
जगाचा इतिहास हा जेत्यांचा इतिहास आहे. जेते होण्यासाठी शस्त्र-सामर्थ्य, शस्त्रांची अचूक विध्वंसकता, सैन्याची चपळता आणि निसर्गाचे भान या गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व आहे.
अलेक्झांडर दि ग्रेट, चेंगीझ खान, ज्युलियस सीझर, जनरल पॅटन, मियामोटो मुसाशी अशा जगातील गाजलेल्या अजिंक्य योद्ध्यांच्या पंक्तीत आपल्या अचाट पराक्रमाने शत्रूला नामोहरम करणारे थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव घेणे सयुक्तिक ठरेल. त्यांच्या संपूर्ण आयुष्यात बाजीराव ४१ लहान-मोठी युद्धे लढले आणि ती सगळी जिंकले.
असे असूनही थोरले बाजीराव म्हटले की, लोकांना बाजीराव-मस्तानी असे एक आंतरधर्मीय प्रेमप्रकरणच दिसते. बाजीरावांच्या आयुष्यात मस्तानी खूप उशिरा आली. मस्तानीचे वडील छत्रसाल यांचे मराठ्यांशी मैत्रीचे संबंध शिवाजी महाराजांपासून होते. मस्तानीबरोबर बाजीरावांचा सहवास केवळ सतरा महिन्यांइतकाच मर्यादित होता, याचे भान कोणी ठेवताना दिसत नाही, ही खेदाची गोष्ट आहे.
बाजीरावांसारखा लढवय्या, शूर आणि स्वाभिमानी आदर्श पुढील पिढ्यांना खूप स्फूर्तिदायक ठरू शकतो, याचा विचार करून थोरल्या बाजीरावांचे कार्यचरित्र या पुस्तकात वर्णिले आहे.
लेखकाविषयी :
ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ, तत्त्वचिंतक व जाणकार लेखक. 'कालनिर्णय' या विविध भाषांतील जगप्रसिद्ध दिनदर्शिकेचे व कालनिर्णय ब्रॅंडचे सहसंस्थापक व व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत. विविध वृत्तपत्रांतून त्यांनी स्तंभलेखन केले असून जगप्रवाह', 'कशासाठी कुठवर', 'द ग्रेट गेम १९१७', अशा विविध पुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे. सकाळ प्रकाशनातर्फे 'काली काला' व 'नाथ संप्रदायाचे मुकुटमणी - चैतन्यगुरू गोरक्षनाथ' ही पुस्तके प्रकाशित. त्यांच्या पुस्तकांना महाराष्ट्र शासनाच्या तसेच इतर विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
Publisher | Sakal Prakashan |
Author | Jayraj Salgaokar |
Language | Marathi |
ISBN | 978-81-973384-2-7 |
Binding | Paperback |
Pages | 264 |
Publication Year | 20/06/2024 |
Dimensions | 5.5 x 8.5 |