Dhoran Kuthavar Aale ga Bai: Rajya Mahila Dhoran: Tin Dashakancha Aadhava

BK00931

New product

₹ 590 tax incl.

More Info

महिलांसाठी स्वतंत्र धोरण जाहीर करून ते राबवणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य. ठरावीक कालावधीने महिलांच्या प्रश्नांची, त्यावरील अपेक्षित उपाययोजनांची चर्चा होऊन नवे धोरण अंमलात येईल, हा निर्णय १९९४ मध्ये पहिल्या महिला धोरणाद्वारे झाला. दुसरे महिला धोरण २००१मध्ये आणि तिसरे २०१३मध्ये प्रसिद्ध झाले. २०२१मध्ये चौथ्या महिला धोरणाचा मसुदा जाहीर झाला. त्यात सुधारणा करून २०२४मध्ये चौथे महिला धोरण जाहीर झाले.

पहिले महिला धोरण अंमलात आले त्याला तीन दशकं झाली आहेत. या कालावधीत आलेल्या राज्य महिला धोरणांमुळे एकूण स्त्रीजीवनात काय बदल झाला, धोरणांची अपेक्षित अंमलबजावणी झाली का, त्यात कोणत्या त्रुटी राहिल्या, आजच्या तरुण मुलींच्या आशाआकांक्षांचे प्रतिबिंब या धोरणांमध्ये उमटले आहे का, याचा सविस्तर आढावा घेऊन स्त्रियांच्या पुढच्या वाटचालीसाठी ते उपयुक्त ठरेल, आगामी महिला धोरणे कशी असावीत, याचे मार्गदर्शन व्हावे, या दृष्टिकोनातून हा पुस्तक प्रकल्प यशवंतराव चव्हाण सेंटरच्या पुढाकारातून साकारला आहे.

  • सामाजिक-राजकीय क्षेत्रात दीर्घ काळ कार्यरत असणारे कार्यकर्ते / अभ्यासक / प्रशिक्षक यांचे अभ्यासपूर्ण लेख
  • स्त्री प्रश्नांच्या विविध बाजूंचा सांगोपांग वेध
  • उपयुक्त आणि संग्राह्य दस्तऐवज

पुस्तक कोणासाठी?

  • स्त्री प्रश्नांचे अभ्यासक
  • पत्रकार
  • राज्यशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र विषयांचे विद्यार्थी आणि शिक्षक
  • धोरणकर्ते
  • प्रशासकीय अधिकारी
  • एमपीएससी / यूपीएससी सारख्या स्पर्धापरीक्षांचे विद्यार्थी

संपादक संध्या नरे-पवार यांच्याविषयी :
तीस वर्षे पत्रकारिता क्षेत्रात; पत्रकार आणि संपादक म्हणून कार्यरत
जात, वर्ग आणि लिंगभाव या विषयांच्या अभ्यासक - लेखक

प्रकाशित पुस्तके :
'तिची भाकरी कोणी चोरली? : बहुजन स्त्रीचे वर्तमान', 'डाकिण : एक अमानवी प्रथा - शोध आणि अन्वयार्थ'

प्रकाशित दीर्घ लेख :
'बहुजन स्त्रीची लैंगिकता आणि जात' ('संदर्भासहित स्त्रीवाद'),
'स्त्रिया आणि राजकारण' ('बदलता भारत'),
'ऋग्वेद काळ आणि स्त्रिया ('बहुजन कष्टकरी स्त्रियांचे सामाजिक - सांस्कृतिक योगदान : वेदकाळ' संशोधन प्रकल्प)

पुरस्कार :
अध्यक्ष, जनवादी साहित्य संमेलन (२०२२)
पत्रकारितेतल्या योगदानासाठी राज्य व राष्ट्रीय पातळीवरील अनेक पुरस्कार
दोन्ही पुस्तकांना राज्य वाङमयीन पुरस्कारासह इतर वेगवेगळे पुरस्कार

Features

PublisherSakal Prakashan
AuthorEditor : Sandhya Nare-Pawar
LanguageMarathi
ISBN978-93-89834-91-8
BindingPaperback
Pages392
Publication Year21/06/2024
Dimensions5.5 x 8.5

Reviews

Write a review

Dhoran Kuthavar Aale ga Bai: Rajya Mahila Dhoran: Tin Dashakancha Aadhava

Dhoran Kuthavar Aale ga Bai: Rajya Mahila Dhoran: Tin Dashakancha Aadhava