Anandache Zad

BK00879

New product

₹ 350 tax incl.

More Info

सध्याच्या काळात अनेक प्रकारच्या संकटांनी, दुःखांनी, अनिश्चिततेने संपूर्ण जगभरचा समाज ग्रासलेला दिसतो. या पार्श्वभूमीवर जीवन सुंदरतेने जगण्याची प्रेरणा देणारे... 'आनंदाचे झाड'.
बऱ्याचदा भौतिक सुखं मिळवण्याच्या हेतूने मनुष्य धार्मिकस्थळांकडे वळतो; तर काहींना मानसिक शांती हवी असते, म्हणून अध्यात्ममार्गाचा अवलंब केला जातो. सुखाचे विषय हे व्यक्तिसापेक्ष असतात. आनंद ही मात्र आत्म्याची एकमात्र भावना असते. याचे स्वानुभवांतून मार्गदर्शन
हे कालाधीन जीवन सुंदर करण्यासाठी जीवनाचा उद्देश, मिळालेले गुण, आणि गंतव्य ठिकाण यांविषयी सारासार विवेक केला तर, आहे ते जीवन सुंदरतेने जगता येतं आणि आनंदमार्ग कसा प्रकाशित होत जातो, हे सांगणारे!
दैनंदिन जीवन सुंदरतेने जगतानाच आत्मिक आनंदाकडे जाण्याचे अनुभवनिष्ठ दर्शन साध्या साध्या गोष्टी-घटनांमधून घडवण्याचा प्रयत्न करणारे!
अध्यात्माचे आवड असणारे, दैनंदिन जीवनात अध्यात्माचा समावेश करू इच्छिणारे, थोडक्यात छोट्या छोट्या गोष्टींतून आनंद घेऊ इच्छिणाऱ्या सर्वांसाठी

लेखकाविषयी माहिती : राजेन्द्र खेर साहित्यिक, अभ्यासक आणि निरूपणकर्ते आहेत. प्राचीन भारतीय शास्त्रांचे अभ्यासक. त्यांचे 'गीताशास्त्र', 'दैनंदिन भगवद् गीता', 'बृहत् गीताशास्त्र' हे ग्रंथ प्रकाशित. अध्यात्म, श्रीमद् भगवद्गीता, महाभारत, यांतील विविध विषयांवर जवळपास ५०० व्याख्याने. ऐतिहासिक-पौराणिक-चरित्र कादंबऱ्यांचे लेखक. चित्रपट क्षेत्रात त्यांनी नऊ वर्षे लेखन-दिग्दर्शन, निर्मिती अशा विविध क्षेत्रांत काम. ‘मायबोली’ वाहिनीवर त्यांनी दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. आजवर १५ पुस्तके प्रकाशित.

Features

PublisherSakal Prakashan
AuthorRajendra Kher
LanguageMarathi
ISBN978-81-973384-0-3
BindingPaperback
Pages216
Publication Year26/06/2024
Dimensions5.5 x 8.5

Reviews

Write a review

Anandache Zad

Anandache Zad