Zen Tatvadnyan

BK00903

New product

झेनचे तत्त्वज्ञान गूढ आणि जटिल नाही; तर ते वैचारिक शिस्त लावणारे व आचरणात आणता येतील असे साधे व सोपे धडे देणारे अनुभुतीजन्य तत्त्वज्ञान आहे.

More details

₹ 250 tax incl.

More Info

झेन तत्त्वज्ञानाचा उगम भारतात झाला असला तरी, त्या लहानशा ओढ्याचा विशाल प्रवाह मात्र चीन, जपान व कोरियासारख्या देशांत विकसित झाला, हे लक्षात घेतले पाहिजे. या पौर्वात्त्य तत्त्वज्ञानाचा मनःस्नेही प्रकाश पाश्‍चिमात्त्य लोकांनादेखील प्रसन्न करणारा वाटला. त्यांनी तो व्यक्तिगत व संघटनात्मक आयुष्यात आचरणात आणला, हे विशेष!

द्वेष, ईर्ष्या, हाव, मोह, लोभ आणि अकारण गर्व या सर्वांमुळे आपण स्वतःचे खरे स्वरूप विसरतो. ज्ञानाच्या व विवेकाच्या सामर्थ्याने अज्ञानाचा पराभव करता येतो, हे झेनचे व्यवहार्य आणि प्रभावी सूत्र आहे. स्वतःला ओळखा, स्वतःवर विश्‍वास ठेवा आणि स्वतःवर प्रथम विजय मिळवा, ही झेन तत्त्वज्ञानाची मूलतत्त्वे आहेत. ती जीवनाच्या सर्वच क्षेत्रातील व्यक्तींना सारखीच लागू पडणारी आहेत.

लेखकाविषयी :
संजय कप्तान यांनी व्यवस्थापन व वाणिज्यविषयक, विज्ञान व तंत्रज्ञान, चरित्र असं विविध प्रकारचे लेखन केले आहे. जेन गुडाल, मेरी क्युरी, लिओनार्दो, विज्ञानवेत्ता न्यूटन, व्यवस्थापन बोध, गुणवत्ता संस्कृती अशी त्यांची विविध पुस्तके प्रकाशित झालेली आहेत.

Features

PublisherSakal Prakashan
AuthorSanjay Kaptan
LanguageMarathi
ISBN978-81-975255-0-6
BindingPaperback
Pages168
Publication Year04/07/2024
Dimensions5.5 x 8.5

Reviews

Write a review

Zen Tatvadnyan

Zen Tatvadnyan

झेनचे तत्त्वज्ञान गूढ आणि जटिल नाही; तर ते वैचारिक शिस्त लावणारे व आचरणात आणता येतील असे साधे व सोपे धडे देणारे अनुभुतीजन्य तत्त्वज्ञान आहे.