More Info
डॉ. भरत बलवल्ली यांच्या स्वरांची आणि आयुष्याची ओळख करून घेण्यापासून ते स्वरांची शरणागती पत्करून संगीत आणि अध्यात्म यांच्या मधला दुवा प्रस्थापित करून जगातल्या गानरसिकांना एका अलौकिक आनंदाची अनुभूती करून देणाऱ्या एका स्वराधीशाचे साररूपातले हे आत्मकथन आहे. कलाक्षेत्रात रममाण होताना कमी वयातच एका वेगळ्या उंचीवर पोहोचलेल्या भरतजींनी त्यांच्या संगीत तपश्चर्येतून राष्ट्र निर्माणाचे जे कार्य सुरू ठेवले आहे ते आजच्या तरुण पिढीतल्या कलाकारांसाठी एक खूप मोठी प्रेरणा आहे. त्यांच्या या जीवन प्रवासातील अनुभव हे सर्वांना अत्यंत मार्गदर्शक आणि शिखरावर पोहोचण्याचे सामर्थ्य देणारे आहेत.
या पुस्तकात त्यांचे प्रखर सांगीतिक सिद्धांत, आध्यात्मिक तत्त्वे आणि सामाजिक कार्यांचे आत्मकथन असून त्याचे शब्दांकन आणि संपादन हे सुप्रसिद्ध नट आणि पटकथा लेखक श्री. प्रविण विठ्ठल तरडे यांनी केले आहे.
अभिप्राय :
'स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कविता आणि डॉ. भरतजींचे संगीत हा एक दुर्मीळ, अनोखा आणि पवित्र योग आहे. त्यांनी भारतीय संगीताची तपश्चर्या केली; आणि त्या संगीताचा उपयोग स्वतःच्या भौतिक सुखाच्या प्राप्तीसाठी न करता राष्ट्रोद्धाराच्या कार्यासाठी केला. यात त्यांच्यावर असलेल्या पूर्वजन्मीच्या संस्कारांचा मोठा वाटा आहे; याबद्दल मी डॉ. भरतजींचे हार्दिक अभिनंदन करतो "
- नरेंद्र मोदी, प्रधानमंत्री, भारत
"स्वराधीश डॉ. भरत बलवल्ली हे स्वतः गायन कलेचे उपासक आहेत. त्यांनी आपल्या प्रतिभेमुळे अल्पावधीतच संगीतकलेमध्ये स्वतंत्र गायनशैलीचा ठसा उमटवला आहे. त्यांनी लिहिलेल्या 'भरतवाक्य' या ग्रंथात भारतीय कलांचा आध्यात्मिक पाया आणि त्यावर आधारित कलेचा रियाज व तपश्चर्या या द्वारे त्यांना स्वानुभवातून प्राप्त झालेले ज्ञान आपल्याला साररूपात वाचायला मिळेल अशी खात्री वाटते.
- श्री. मोहन भागवत सरसंघचालक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
"भरत गात असताना त्याच्या मागे आमचे बाबा उभे आहेत असा मला भास होतो. बाबांच्या शैलीत गाणे ही गोष्ट त्यांची कृपा असल्याशिवाय शक्य नाही. भरत आमच्या बाबांची गायकी अभ्यासपूर्वक आणि समर्थपणे गातो; याबद्दल आम्ही सर्व मंगेशकर कुटुंबीय त्याचे अत्यंत आभारी आहोत."
- भारतरत्न लता मंगेशकर