Baki Kahi Nahi

BK00923

New product

मुक्तछंद, वृत्तबंध आणि गझल या विविध प्रकारच्या कविता ‘बाकी काही नाही’ या काव्यसंग्रहात कवी किरण वेताळ यांनी अगदी सहजपणे, ओघवत्या शैलीत मांडल्या आहेत.

More details

₹ 199 tax incl.

More Info

मुक्त कविता, गणवृत्त कविता, मात्रावृत्त कविता, अभंग, अष्टाक्षरी, षडाक्षरी, ओळकाव्य, साखळी काव्य, सुनीत, लावणी, घनाक्षरी काव्य, फटका, गीत, गझल अशी विविध सुगंधी फुले या काव्यसंग्रहात कवीने उत्स्फूर्तपणे मांडली आहेत. इतके सारे विविध काव्यप्रकार एकाच पुस्तकात असणे हे या काव्यसंग्रहाचे वैशिष्ठ्य आहे.


या संग्रहात दोन विभाग केले आहेत. ‘किरणोत्सव’ या विभागात ५१ छंदोमय कविता आहेत. दुसऱ्या ‘इर्षाद’ विभागात ५० गझल रचना आहेत. अशी एकूण १०१ कवितांची अद्भुत भेट कवी किरण वेताळ यांनी रसिक वाचकांना दिली आहे.

कवीविषयी :
कवी किरण ज्ञानदेव वेताळ हे सध्या पुण्यात राहत असून, त्यांनी बीई सिव्हिल केले आहे. ‘बासरी’ हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह असून ‘बाकी काही नाही’ हा दुसरा काव्यसंग्रह आहे. काव्यलेखन, वाचन, भटकंती, सायकलिंग ही त्यांचे छंद आहेत. त्यांना अनेक काव्यलेखन स्पर्धेत पारितोषिके मिळाली आहेत. तसेच विविध साहित्यिक कार्यक्रमांना त्यांनी स्वतःच्या कविता, गझल सादर केल्या आहेत.

Features

PublisherSakal Prakashan
AuthorKiran Vetal
LanguageMarathi
ISBN978-81-975255-6-8
BindingPaperback
Pages114
Publication Year2024-07-13
Dimensions5.5 x 8.5

Reviews

Write a review

Baki Kahi Nahi

Baki Kahi Nahi

मुक्तछंद, वृत्तबंध आणि गझल या विविध प्रकारच्या कविता ‘बाकी काही नाही’ या काव्यसंग्रहात कवी किरण वेताळ यांनी अगदी सहजपणे, ओघवत्या शैलीत मांडल्या आहेत.