New Olympic Champion Neeraj Chopra (Marathi)

Olympic Champion Neeraj Chopra (Marathi)

BK00936

New product

एका शेतकऱ्याचा मुलगा ते ऑलिंपिक स्पर्धेतील पदकविजेता हा नीरजचा प्रवास कथन करणारे हे चरित्र केवळ क्रीडापटूंनाच नव्हे, तर सर्वच वाचकांना प्रेरणा देणारे ठरावे.

More details

₹ 180 tax incl.

More Info

७ ऑगस्ट २०२१... दिवस उजाडला आणि तो क्षण आला! देशाचा लढवय्या खेळाडू नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये दुसऱ्याच प्रयत्नात ८७.५८ मीटर इतक्या लांबवर भाला फेकला आणि सुवर्णपदकावर भारताचे नाव कोरले! ऑलिम्पिकच्या मुख्य स्टेडियममध्ये— जिथे फक्त ॲथलेटिक्सचे खेळ होतात— १२५ वर्षांत प्रथमच तिरंगा फडकला आणि ‘जन-गण-मन’ची धून निनादली.

प्रा. संजय पांडुरंग दुधाणे यांनी नीरजच्या अभूतपूर्व कामगिरीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला अन्‌ नीरजचे चरित्र शब्दबद्ध करण्याचा निश्चय केला. त्यातूनच साकारले प्रस्तुत पुस्तक, ‘ऑलिम्पिक चॅम्पियन : नीरज चोप्रा’.

प्रा. दुधाणे यांनी नीरजची मेहनत आणि त्याच्या कारकीर्दीतील चढउतार किती जवळून पाहिले आहेत, याचा प्रत्यय हे पुस्तक वाचताना प्रत्येक क्रीडाप्रेमीला यावा. एका शेतकऱ्याचा मुलगा ते ऑलिंपिक स्पर्धेतील पदकविजेता हा नीरजचा प्रवास कथन करणारे हे चरित्र केवळ क्रीडापटूंनाच नव्हे, तर सर्वच वाचकांना प्रेरणा देणारे ठरावे.

लेखक परिचय :

  • क्रीडा पत्रकारिता, क्रीडाप्रचार आणि क्रीडाप्रसार क्षेत्रांत २५ वर्षांहून अधिक काळ कार्यरत. १९९६पासून क्रीडा पत्रकारितेत कार्यरत.
  • ‘सकाळ’सह महाराष्ट्रातील प्रमुख दैनिकांतून १६००हून अधिक क्रीडाविषयक लेख प्रकाशित. ‘अष्टपैलू’ दिवाळी अंकाचे संपादन.
  • पुणे आणि कोल्हापूर आकाशवाणीवर कार्यक्रम.
  • न्यूज १८ लोकमत आणि टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहि न्यांसाठी थेट वार्तांकन.
  • ऑलिंपिक यशाचा षट्कार अनुभवणारे एकमेव मराठी क्रीडापत्रकार

Features

PublisherSakal Prakashan
AuthorSanjay Dudhane
LanguageMarathi
ISBN978-81-975255-3-7
BindingPaperback
Pages124
Publication Year22/07/2024
Dimensions5.5 x 8.5

Reviews

Write a review

Olympic Champion Neeraj Chopra (Marathi)

Olympic Champion Neeraj Chopra (Marathi)

एका शेतकऱ्याचा मुलगा ते ऑलिंपिक स्पर्धेतील पदकविजेता हा नीरजचा प्रवास कथन करणारे हे चरित्र केवळ क्रीडापटूंनाच नव्हे, तर सर्वच वाचकांना प्रेरणा देणारे ठरावे.