BK00934
New product
साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ग्रंथ
Warning: Last items in stock!
Availability date:
Tukaram Darshan (PB)
साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ग्रंथ
Recipient :
* Required fields
or Cancel
तुकाराम वारकऱ्यांपुरता मर्यादित नाही; तो रोजच्या जगण्यात सोबत करणारा, आपल्यासारखाच धडपडणारा मित्र आहे; पण यापलीकडे जाऊन जीवनाचे साध्य काय असावे याची मांडणी करणारा तत्त्वज्ञ आहे आणि तिथे पोहोचण्यास मदत करणारा मार्गदर्शकही आहे. महाराष्ट्रातील विचारवंतांना, नेत्यांना प्रेरणा देणाऱ्या तुकारामाच्या अभंगांनी मराठी भाषेला समृद्ध केले आणि सर्वसामान्यांना जगण्यासाठी ऊर्जा दिली. तुकाराम आणि महाराष्ट्र वेगळा करून पाहता येतच नाही, याचे भान देणारा ग्रंथ.
अभिप्राय :
अनेक ज्ञानशाखांना स्पर्श करणारा आणि संशोधनाची नवी पायवाट तयार करणारा, तटस्थपणे जातिनिरपेक्ष लेखन करणारा ग्रंथ. या ग्रंथात सांस्कृतिक दृष्टिकोनातून महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण व साहित्यकारण यांचा वेध घेतला आहे.
- डॉ. य. दि. फडके
ज्याला महाराष्ट्राचा आणि मराठी संस्कृतीचा अभ्यास करायचा आहे त्याला तुकोबा ही मोक्याची जागा पकडावीच लागेल. तुकोबा हा सांस्कृतिक टेहळणीसाठी मोक्याचा बुरूज आहे. येथून चौफेर दृष्टिक्षेप टाकता येतो, आणि एरवी नजरेतून सुटणाऱ्या अनेक बाबी अचूकपणे टिपता येतात. त्यांच्या मते तुकोबा एक सम्यक सांस्कृतिक परिप्रेक्ष्य आहे, म्हणूनच तुकोबांच्या व्यक्तित्वाचा वेध थेट ज्ञानदेवांपर्यंत, खरे तर पुंडलिकापर्यंत पोहोचला व दुसऱ्या बाजूला शिवकाल, उत्तर मराठेशाही, पूर्वोत्तर पेशवाई आणि अव्वल इंग्रजी काळातील प्रबोधन इत्यादी टप्पे ओलांडत थेट इथे आणि आत्ता अशा जिवंत वर्तमानात उतरतो.
- प्रा. राम बापट
तुकोबा हा वारकरी परंपरेतील सर्वोच्च आविष्कार होता. तुकारामांना वगळून मराठी संस्कृतीचा विचार करता येणार नाही. मराठी संस्कृतीची सर्वांगीण समीक्षा करणारा ग्रंथः -
- दिलीप पुरुषोत्तम चित्रे
Publisher | Sakal Prakashan |
Author | Dr. Sadanand More |
Language | Marathi |
ISBN | 978-81-975255-8-2 |
Binding | Paperback |
Pages | 728 |
Publication Year | 17/07/2024 |
Dimensions | 5.5 x 8.5 |
निवडक सकल संत सार्थ गाथा...
₹ 350
₹ 150
₹ 150