Parivartan

BK00882

New product

₹ 125 tax incl.

More Info

उषा माणगांवकर यांच्या ‘परिवर्तन’ या कथासंग्रहात दोन दीर्घ कथा आहेत. या दोन्ही कथा सामाजिक आणि वैयक्तिक जाणिवेच्या आहेत. या कथांची शैली ही अधिक बोलकी आणि प्रसंग फुलवून सांगणारी आहे. या कथांमधल्या नायिका या वास्तववादी असून, आजूबाजूला घडणाऱ्या नकारात्मक घटनांना धैर्याने तोंड देणाऱ्या आहेत. पुरुषी अहंकार आणि पुरुषी वासनेला जाणीवपूर्वक लढा देणाऱ्या या नायिका वाचकाच्या मनाचा ठाव घेतात. लेखिकेने प्रसंगांची गुंफण ही प्रभावीपणे केली आहे. सामाजिक आणि स्त्रीजीवनावर भाष्य करणाऱ्या या कथा वाचकांना विचार करायला प्रवृत्त करतील यात शंका नाही.

लेखिकेविषयी :
उषा माणगांवकर यांचा एक कथासंग्रह प्रकाशित असून, त्यांच्या ६ एकांकिका प्रकाशित आहेत. त्यांना कथा लिहायला आवडतात. सध्या त्यांचे वास्तव्य पुण्यातील बाणेर या परिसरात असून, विविध मासिके, दिवाळी अंक, नियतकालिके, वर्तमानपत्रे यांसाठी त्या सातत्याने लिखाण करत असतात.

Features

PublisherSakal Prakashan
AuthorUsha Mangaonkar
LanguageMarathi
ISBN978-81-977101-9-3
BindingPaperback
Pages72
Publication Year14/08/2024
Dimensions5.5 x 8.5

Reviews

Write a review

Parivartan

Parivartan