BK00949
New product
Warning: Last items in stock!
Availability date:
Khan Paan Dnyan
Recipient :
* Required fields
or Cancel
आपल्या घरी येणार्या पाहुण्यांचे कोरडे स्वागत न करता त्यांना खाऊ पिऊ घालणारी भारतीय खान-पान संस्कृती अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. अगत्यशील आतिथ्य जपणारी ही संस्कृती आगळीवेगळी आहे, कारण भारतातील प्रांतागणिक बदलत जाणारे खाद्यवैविध्य भौगोलिक परिसर, ऋतुमान यांचा विचार करूनच विकसित करण्यात आले आहे. म्हणूनच 'अन्न हे पूर्णब्रह्म' ठरण्यासाठी अन्न आणि आरोग्य यांचा सहसंबंध नीट समजून घ्यायला हवा. प्रख्यात शेफ विष्णू मनोहर यांनी या पुस्तकात रसना तृप्तीबरोबरच आरोग्यपूर्णतेला महत्त्व दिले आहे. खानपानाच्या संस्कृतीचे ज्ञान देणारे हे पुस्तक म्हणूनच आगळेवेगळे आहे.
लेखकाविषयी : आंतरराष्ट्रीय दर्जाचे शेफ. कल्पकता आणि विविधता यांची सांगड घालणाऱ्या विष्णू मनोहर यांचे चाहते फक्त भारतातच नव्हे तर जगभरात आहेत. त्यांची विविध विषयांवर आधारित एकूण ५६ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्यांच्या अनेक विक्रमांची नोंद झाली आहे.
Publisher | Sakal Prakashan |
Author | Vishnu Manohar |
Language | Marathi |
ISBN | 978-81-977101-1-7 |
Binding | Paperback |
Pages | 146 + 6 |
Publication Year | 2024/08/19 |
Dimensions | 5.5 x 8.5 |