BK00901
New product
Warning: Last items in stock!
Availability date:
Apatyajanmache Samajbhan
Recipient :
* Required fields
or Cancel
स्त्री-रोगतज्ज्ञ आणि प्रसूतिशास्त्रतज्ज्ञ म्हणून डॉ. किशोर अतनूरकर प्रसिद्ध आहेत. रुग्णांशी संवाद साधण्याच्या हातोटीमुळे डॉ. अतनूरकरांकडे अनुभवांची भलीमोठी शिदोरी आहे. त्यामुळे अपत्यजन्माकडे ते फक्त एक नैसर्गिक प्रक्रिया या दृष्टिकोनातून बघत नाहीत. ‘अपत्यजन्म ही एक गांभीर्याने घेण्याची गोष्ट आहे,’ या त्यांच्या विचारातून ‘अपत्यजन्माचे समाजभान’ पुस्तकाचा जन्म झाला आहे! अपत्यजन्माच्या वैयक्तिक, कौटुंबिक, शैक्षणिक, आर्थिक, भौगोलिक, कायदेविषयक आणि रूढी-परंपराविषयक बाजूंचाही विचार लेखकाने या पुस्तकात मांडला आहे.
गर्भधारणा ही पूर्वनियोजितच असायला हवी, असा डॉ. अतनूरकर यांचा आग्रह आहे. गर्भधारणा आणि बाळंतपणाच्या बाबतीत जनमानसावर ज्या पारंपरिक प्रथांचा पगडा आहे, त्यातील कोणत्या सोडून द्यायला हव्यात, याचे तर्कशुद्ध विश्लेषण लेखकाने केले आहे. नॉर्मल प्रसूती की सिझेरियन आणि पुरुष नसबंदीबद्दलचे समाजभान हा कशा प्रकारे एक चिंतेचा विषय आहे; अशा विविध मुद्द्यांना पुस्तकात स्पर्श करण्यात आला आहे.
लेखकाविषयी :
डॉ. किशोर अतनूरकर
एमडी (स्त्री-रोग आणि प्रसूतिशास्त्र), पीएचडी (समाजशास्त्र) एमएस (काउन्सेलिंग आणि सायकोथेरपी)
• नांदेड शहरात गेल्या ४० वर्षांपासून स्त्री-रोग आणि प्रसूतिशास्त्रतज्ज्ञ म्हणून खासगी व्यवसाय.
• दहा हजारांपेक्षा जास्त सिझेरियन प्रसूती, गर्भ पिशवीच्या सुमारे तीन हजार शस्त्रक्रिया आणि स्त्री-रोगाशी संबंधित इतर अनेक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांमध्ये सहभाग.
• मागील २५ वर्षांपासून सहभागी झालेल्या प्रत्येक सिझेरियन संदर्भात विविध पैलूंच्या नोंदी. त्या माहितीवर आधारित शोधनिबंध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध नियतकालिकांमधून प्रकाशित.
• निर्णय तुझा माझा ही पाळणा लांबवण्याच्या साधनांविषयीची पुस्तिका प्रसिद्ध.
तिच्या आरोग्यासाठी सर्व काही या पुस्तकास मराठी विज्ञान परिषद, मुंबई यांच्यातर्फे पुरस्कार प्राप्त.
• किशोरवयीन मुलांच्या मनात मुलींबद्दल असलेले शारीरिक आकर्षण आणि कमालीची उत्तेजना या संदर्भातील प्रश्नांचीउकल करण्याकरिता अनेक शाळा आणि महाविद्यालयांना भेटी देऊन प्रबोधन.
• महिला रुग्णांकडे एक स्त्री-रोगतज्ज्ञ म्हणून नव्हे, तर ‘स्त्री-आरोग्य अभ्यासक’ या भूमिकेतून पाहून, त्यांच्या समस्यांचे निराकरण शारीरिक, मानसिक, आर्थिक, कौटुंबिक आणि सामाजिक पैलू विचारात घेऊन करण्यासाठी प्रयत्नशील.
Publisher | Sakal Prakashan |
Author | Dr. Kishor Atnurkar |
Language | Marathi |
ISBN | 978-93-48048-97-4 |
Binding | Paperback |
Pages | 200 |
Publication Year | 02/09/2024 |
Dimensions | 5.5 x 8.5 |