BK00733
New product
बारामतीच्या विकासाचा त्यातही कृषी विकासाचा 'पॅटर्न' नक्की काय आहे? हा विकास कसा झाला? याची माहिती म्हणजे बारामती कृषी पॅटर्न हे पुस्तक!
Warning: Last items in stock!
Availability date:
Baramati Krushi Pattern
बारामतीच्या विकासाचा त्यातही कृषी विकासाचा 'पॅटर्न' नक्की काय आहे? हा विकास कसा झाला? याची माहिती म्हणजे बारामती कृषी पॅटर्न हे पुस्तक!
Recipient :
* Required fields
or Cancel
*लेखक डॉ. आप्पासाहेब आक्कापा पवार अर्थशास्त्राचे पदवीधर असून त्यांनी 'बारामती पॅटर्न' या विषयात कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून पीएचडी संपादन केली आहे.
*डॉ. पवार यांनी यानिमित्ताने बारामती परिसरातील मागील चाळीस वर्षांच्या विकासाच्या वाटचालीचा टप्याटप्याने आढावा पुस्तकात घेतला आहे.
* ‘कृषी विकास प्रतिष्ठान’ (अॅग्रिकल्चरल डेव्हल्पमेंट ट्रस्ट), कृषी विज्ञान केंद्र, बारामती आणि विद्या प्रतिष्ठान या तीन संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे सक्षमीकरण, तंत्रज्ञान आणि शैक्षणिक विकास कसा साधला याचे वर्णन यामध्ये आहे.
* ‘कृषी विकास प्रतिष्ठान’ची १९७०मध्ये मा. शरद पवार यांनी स्थापन केली, यामुळे ‘बारामती कृषी पॅटर्न’चा पाया कसा घातला गेला. याचे विवेचन यामध्ये आहे.
* मा. कृषिमंत्री, शरद पवार आणि त्यांचे वडीलबंधू पद्म श्री कृषिरत्न, आप्पासाहेब पवार यांच्या बारामतीतील शेती व शेतकरी सक्षमीकरण करण्याच्या कार्यावर आधारित हे पुस्तक महत्त्वपूर्ण आहे. * बारामतीकरांसह, शेतकरी, युवापिढी, विद्यार्थी, सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था आणि राजकीय नेतृत्वाला मार्गदर्शक ठरणारी 'बारामती कृषी पॅटर्न'ची यशोगाथा!
लेखकाविषयी माहिती : डॉ. आप्पासाहेब आक्काप्पा पवार यांनी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथून एमए (अर्थशास्त्र) आणि पीएचडी (बारामती पॅटर्न) पदवी संपादन केली आहे. डॉ. पवार शिवराज महाविद्यालय, गडहिंग्लज येथून सेवानिवृत्त झाले आहेत. लायन्स क्लब, गडहिंग्लजककडून 'उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार', 'इंदिरा प्रियदर्शनी वृक्षमित्र पुरस्कार'साठी नामांकन त्यांना प्राप्त झाले आहे. 'परिवर्तनाच्या दिशा', 'परिवर्तनाच्या वाटा' या मासिकांचे आणि 'लोक अक्षर पब्लिकेशन', 'रा. म. माद्याळकर एज्युकेशन सोसायटी' या संस्थांचे सल्लागार म्हणून ते कार्यरत आहेत.
Publisher | Sakal Prakashan |
Author | Dr. Appasaheb Pawar |
Language | Marathi |
ISBN | 9788197525520 |
Binding | Paperback |
Pages | 148 |
Publication Year | 03/09/2024 |
Dimensions | 5.5 x 8.5 |