BK00830
New product
डॉ. मोहन दिवटे यांनी ‘लखोबा सावकार’ या नायकाचे विविध वास्तववादी पदर या कादंबरीतून अतिशय वेधकपणे मांडले आहेत.
Warning: Last items in stock!
Availability date:
Lakhoba Savkar
डॉ. मोहन दिवटे यांनी ‘लखोबा सावकार’ या नायकाचे विविध वास्तववादी पदर या कादंबरीतून अतिशय वेधकपणे मांडले आहेत.
Recipient :
* Required fields
or Cancel
‘लखोबा सावकार’ ही कादंबरी शोकात्म असून ती मानवी भाव-भावनांच्या विविध छटांनी रंगलेली आहे. डॉ. मोहन दिवटे यांनी ‘लखोबा सावकार’ या नायकाचे विविध वास्तववादी पदर या कादंबरीतून अतिशय वेधकपणे मांडले आहेत. जगण्याच्या संघर्षात लखोबा वेगवेगळ्या वाटा जोखाळतो. दुकानदारी, व्यापार, सावकारी, गुत्तेदारी, शिक्षण, राजकारण या सर्वच क्षेत्रात लाखोबाने स्वतःचा ठसा उमटवायचा प्रयत्न केला आणि त्यातून ही कादंबरी लेखकाने अतिशय आकर्षकरित्या गुंफली आहे. ही कादंबरी अतिशय कलात्मक असून वास्तव आणि मानवी जीवनाचा संघर्ष यांची एक अनोखी कहाणी आहे. वाचकांना खिळवून ठेवणारी नाट्यपूर्ण अशी ग्रामीण जीवनातील वास्तव मांडणारी वाचनीय कादंबरी आहे.
लेखकाविषयी :
डॉ. मोहन दिवटे हे सध्या महावितरणमध्ये जनसंपर्क अधिकारी आहेत. त्यांची ‘जनसंपर्क आणि प्रसार माध्यमे’ आणि ‘लढता लढता कोरोनाशी.. रक्ताळल्या प्रकाशवाटा’ ही दोन पुस्तके प्रकाशित आहेत. ‘लढता लढता कोरोनाशी.. रक्ताळल्या प्रकाशवाटा’या पुस्तकाला 2022 सालचा ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकादमी’चा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला आहे. राज्यातील विविध वृत्तपत्र, मासिके, नियतकालिकांतून डॉ. दिवटे सातत्याने विपुल लेखन करत असतात.
Publisher | Sakal Prakashan |
Author | Dr. Mohan Divate |
Language | Marathi |
ISBN | 978-81-977101-5-5 |
Binding | Paperback |
Pages | 128 |
Publication Year | 09/09/2024 |
Dimensions | 5.5 x 8.5 |