Jar-Tar chya Goshti - Bhag 2

BK00885

New product

जर असं झालं तर, किंवा जर असं झालं नाही तर, अशा प्रश्नांची तर्कसंगत उत्तरं देणारे पुस्तक 

More details

₹ 250 tax incl.

More Info

कोरोनानं धुमाकूळ घातला नसता तर, ऑनलाइन शाळा, वर्क फ्रॉम होम, घरपोच सामान मागवणं, अशा पर्यायांचा विचारही आपण केला असता का? पण हे तहान लागल्यावर विहीर खणण्यासारखं झालं. तोपर्यंत कशाला थांबायचं? एरवीही जर कोरोनाचं संकट उभं राहणार नसेल तर? त्याला प्रतिबंध करणारी लस तयार झाली नसेल तर? प्रत्यक्ष एखादी घटना समोर येण्यापूर्वीच भविष्यवेधी अशा 'जर-तर'च्या प्रश्नांचा विचार केला तर ज्यांची स्वप्नातही कल्पना केली नव्हती असे अनेक पर्यायी उपाय दिसू लागतात. त्यांचा पाठपुरावा करत नवनिर्मितीला चालना मिळते.

लेखकाविषयी :
डॉ. बाळ फोंडके, ज्येष्ठ वैज्ञानिक आणि विज्ञानलेखक
तेवीस वर्षे भाभा अणुसंशोधन केंद्रात भौतिकी क्षेत्रातील संशोधनानंतर ‘सायन्स टुडे’ या अग्रेसर विज्ञानमासिकाचे प्रमुख संपादकपद डॉ. बाळ फोंडके यांनी भूषवले. त्यानंतर टाइम्स ऑफ इंडिया समूहातील सर्व दैनिक वृत्तपत्रांचे ते विज्ञान संपादक होते. १९८९ मध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या आमंत्रणावरून दिल्लीला ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स कम्युनिकेशन’ या ‘सीएसआयआर’च्या संस्थे चे संचालकपद त्यांनी स्वीकारले.
गेल्या साडेचार दशकांहून अधिक काळ त्यांनी विज्ञानविषयक लेख आणि सकस विज्ञानकथांचे लेखन केले आहे. इंग्लिश व मराठी भाषांत मिळून आजवर त्यांची ७०हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
केंद्र सरकारच्या विज्ञान तंत्रज्ञान विभागाने तयार केलेल्या, देशाच्या विकासासाठी आवश्यक तंत्रज्ञानाचा आढावा घेणाऱ्या ‘टेक्नॉलॉजी व्हिजन २०३५’ या दस्तावेजाचे लेखन करण्यातही त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता.

Features

PublisherSakal Prakashan
AuthorDr. Bal Fondke
LanguageMarathi
ISBN978-81-968004-2-0
BindingPaperback
Pages170
Publication Year19/09/2024
Dimensions5.5 x 8.5

Reviews

Write a review

Jar-Tar chya Goshti - Bhag 2

Jar-Tar chya Goshti - Bhag 2

जर असं झालं तर, किंवा जर असं झालं नाही तर, अशा प्रश्नांची तर्कसंगत उत्तरं देणारे पुस्तक