Kartavyacha Mahameru

BK00933

New product

‘कर्तव्याचा महामेरू’ हे पुस्तक रोहकले कुटुंबाच्या जडणघडणीचा आटोपशीर आणि प्रेरक इतिहास आहे.

More details

₹ 350 tax incl.

More Info

ही प्रेरक गोष्ट याच कुटुंबातील प्रा. सुधाकर रोहकले या कर्तुत्ववान व्यक्तिमत्त्वाने शब्दबद्ध केली आहे. रोहकले कुटुंबाच्या संघर्षाचा आणि उत्कर्षाचा वेध या आत्मकथनात्मक लेखनातून चित्रमयी भाषेतून करण्यात आलेला आहे. रोहकले कुटुंब कशाप्रकारे उभं राहिलं, ते कुठल्या संघर्षातून गेलं याचा धावता आढावा लेखक सुधाकर रोहकले यांनी या पुस्तकातून अतिशय प्रभावीपणे मांडला आहे. ‘मी’ पासून ‘आपणा’ कडे नेणारा दगडूदादा या नीतिवंत आधारवडाचा आणि त्यांच्या पांच पारंब्यांचा जीवनप्रवास चित्तवेधक असून वाचकांना प्रेरणा देणारा आहे.

लेखकाविषयी :
लेखक सुधाकर दगडुजी रोहकले हे सेवानिवृत्त प्राध्यापक आहेत. त्यांनी चौतीस वर्षे विकास ज्युनिअर कॉलेज, विक्रोळी मुंबई येथे प्राध्यापक, उपप्राचार्य या विविध पदांवर काम केले. त्यांना वाचन, लेखन, मैदानी खेळ यांचा छंद आहे. सामाजिककार्यात ते सक्रीयपणे सहभागी असतात. अनेक प्रतिष्ठित आणि मानाचे पुरस्कारही त्यांना मिळाले आहेत.

Features

PublisherSakal Prakashan
AuthorProf. Sudhakar Rohokale
LanguageMarathi
ISBN978-93-48048-91-2
BindingPaperback
Pages154
Publication Year01/10/2024
Dimensions5.5 x 8.5

Reviews

Write a review

Kartavyacha Mahameru

Kartavyacha Mahameru

‘कर्तव्याचा महामेरू’ हे पुस्तक रोहकले कुटुंबाच्या जडणघडणीचा आटोपशीर आणि प्रेरक इतिहास आहे.