New OK... Sorry... Thank You!

OK... Sorry... Thank You!

BK00927

New product

साहित्याच्या आणि व्यंगचित्रांच्या जगात आपले वेगळेपण सिद्ध केलेल्या दोन प्रतिभावंतांचा एक अनोखा प्रकल्प वाचकांच्या भेटीला येणार आहे. प्रसिद्ध कार्टूनिस्ट आलोक निरंतर आणि 'गोष्ट पैशापाण्याची' या बेस्टसेलर पुस्तकाचे लेखक प्रफुल्ल वानखेडे यांनी एकत्रितपणे साकारलेली ही कलाकृती एक नवा अनुभव देणार आहे.

More details

₹ 299 tax incl.

More Info

दोन अनोळखी माणसांची रस्त्यावर होणारी सहज भेट आणि त्यातून पुढे जाणारी गोष्ट हलक्या-फुलक्या शैलीत वाचकांसमोर उभी राहते.
जगण्यातल्या शाश्वत मूल्यांचा गप्पांच्या माध्यमातून, खुमासदार आणि विनोदी पद्धतीने उहापोह करण्यात आला आहे.
आजची सामाजिक परिस्थिती, करिअर, आर्थिक नियोजन आणि साक्षरता, वाचनाचे महत्त्व, नैतिकता, सुख आणि दुःख यांसारख्या विविध विषयांवरच्या विधायक गप्पा सोप्या भाषेत आणि आकर्षक चित्रांच्या माध्यमातून मांडण्यात आले आहे.
एक उद्योजक, एक पत्रकार, एक अनुभवी तरी मिश्किल आजोबा आणि एक होतकरू तरुणी या चार पात्रांच्या माध्यमातून सकारात्मक संदेश अतिशय सोप्या, वाचनीय आणि आकर्षक शैलीत देण्यात आला आहे.

लेखकाविषयी माहिती -

प्रफुल्ल वानखेडे :
गेल्या दोन दशकांपासून औष्णिक ऊर्जा, विविध इंधनांचे सुरक्षित ज्वलन, ऊर्जा संवर्धन या क्षेत्रांतील एक सुपरिचित नाव.... 'केल्हिन व लिक्विगॅस सह पाच कंपन्यांचे संस्थापक व अध्यक्ष, भारतात आणि १८ देशांत त्यांच्या कंपन्या व्यवसाय करतात.
सर्वसामान्य मराठी कुटुंबात जन्मलेल्या प्रफुल्ल यांच्याकडे उद्योगाचा परंपरागत वारसा नव्हताः भांडवल उभे करायला कुठले बळ नव्हते. अशा आव्हानात्मक आणि विपरीत परिस्थितीतही संधी शोधत प्रफुल्ल यांनी उद्योग उभा केला, वाढवला.
टाटा, महिंद्र, वेदांता, बजाज, एलअँडटी, गोदरेज, सिमेन्स, केलॉग्स, मर्सिडीज बेंझ, आयटीसी, ब्लूस्टार आयशर व्होल्वो, आर्सेलर मित्तल, पार्ले, कमिन्स, ब्रिटानिया, सिप्ला, कोलगेट, डाबर, बाटा हिल्टन तसेच एचपीसीएल, आयओसीएल या इंधन क्षेत्रातील बलाढ्य अशा भारतीय आणि मल्टिनॅशनल कंपन्या त्यांचे नियमित ग्राहक आहेत..
इंधन ज्वलन क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान, नियम व मानदंड भारतात प्रस्थापित करण्यात प्रफुल्ल यांचा महत्त्वाचा वाटा आहे. ते केंद्र सरकारच्या BIS कमिटीतील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाच्या तांत्रिक समितीचे, तसेच जागतिक एलपीजी असोसिएशनचे सदस्य आहेत.
सोशल मीडियाच्या जगात जिथं लोक मनोरंजनात व्यग्र आहेत तिथे प्रफुल्ल आर्थिक साक्षरता आणि उद्यमशीलतेचे धडे देत असतात. 'लेट्स रीड' या सशक्त वाचन चळवळीचे ते प्रणेते आहेत.
योग्य पद्धतीने पैसा मिळवणं, वाढवणं आणि समृद्ध जगण्यासाठी तो खर्च करणं यासाठी मूल्य, संस्कार रुजवण्याचे काम प्रफुल्ल वानखेडे अथक करत असतात.

-----------------------

आलोक निरंतर :
आलोक 2011 पासून सकाळ मीडिया ग्रुपचा एडिटोरियल कार्टूनिस्ट आहे.
वयाच्या पंधराव्या वर्षी त्याच्या व्यंगचित्रांचं पाहिलं पुस्तक आलं. त्या पुस्तकाची प्रस्तावना आर के लक्ष्मण, अमिताभ बच्चन, एपीजे अब्दुल कलाम यांनी लिहिली! वयाच्या सोळाव्या वर्षी आलोक रोटरी क्लबच्या युथ एक्सचेंज प्रोग्राम अंतर्गत कॅनडाला गेला.
कॅनडाच्या राजकारणावर त्याने काढलेली व्यंगचित्रं बघून कॅनडाच्या पंतप्रधाननी त्याला पत्र लिहिले.
बेंगलूरू येथील कॉलेज ऑफ फाईन आर्टस् मध्ये त्याने विज्युअल आर्टचे शिक्षण घेतले. त्याचबरोबर न्यू इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्रासाठी कार्टूनिस्ट म्हणून काम केले.
2013, 2016 आणि 2018 चा माया कामत 'एक्सेललेंस इन पोलिटिकल कार्टूनिंग ' हा नामांकित पुरस्कार त्याला मिळाला.
पुणे, बेंगलूरू, कॅनडामध्ये आलोकच्या व्यंगचित्रांची प्रदर्शने भरली. त्यातील दोन प्रदर्शनाचे उदघाटन त्याचे गुरु आर के लक्ष्मण यांनी केले.
ब्रश हा तलवारीपेक्षा प्रभावी आहे असं त्याचं मत आहे. पण ब्रशचा वापर जमेल तितका फक्त गुदगुल्या करण्यासाठीच केला पाहिजे असंही तो म्हणतो.

Features

PublisherSakal Prakashan
AuthorPrafulla Wankhede, Alok Nirantar
LanguageMarathi
ISBN978-81-973384-7-2
BindingPaperback
Pages210
Publication Year09/10/2024
Dimensions5.5 x 8.5

Reviews

Write a review

OK... Sorry... Thank You!

OK... Sorry... Thank You!

साहित्याच्या आणि व्यंगचित्रांच्या जगात आपले वेगळेपण सिद्ध केलेल्या दोन प्रतिभावंतांचा एक अनोखा प्रकल्प वाचकांच्या भेटीला येणार आहे. प्रसिद्ध कार्टूनिस्ट आलोक निरंतर आणि 'गोष्ट पैशापाण्याची' या बेस्टसेलर पुस्तकाचे लेखक प्रफुल्ल वानखेडे यांनी एकत्रितपणे साकारलेली ही कलाकृती एक नवा अनुभव देणार आहे.

Customers who bought this product also bought: