Sadebara Lakhanchi Khandani

BK00880

New product

कार्पोरेट जगातील सत्य घटनांवर आधारित असलेली संजय सुखटणकर लिखित साडेबारा लाखांची खंडणी ही कादंबरी!

More details

₹ 399 tax incl.

More Info

*कंपनीचा पेर्सोनेल मॅनेजर कथेचा नायक आहे. त्याच्याभोवती फिरणारे अनेक प्रसंग, तणावपूर्ण घटना यांतून कॉर्पोरेट विश्वातील घडामोडींची माहिती मिळते. कादंबरीत एक रंजकता असूनही सत्य घटनांवर ती आधारित असल्याने त्याचे संदर्भ सद्यस्थितीतही लागू होतात.
*मुंबईत, १९८०च्या दशकात कामगार चळवळीत राजकारणी तसेच सामाजिक अपप्रवृत्तींचा प्रवेश झाला. आणि कामगार संघटना आक्रमक झाल्या. त्यांच्याबरोबर काम करणे व्यवस्थापनांसाठी अतिशय अवघड बनले. तो संघर्ष कसा होता? याचे वर्णन यात वाचायला मिळते.
*एकमेकांचे खच्चीकरण करण्यासाठी सुरू असलेली चढाओढ, कामगार नेतृत्वाचे अपयश किंवा युनियनचा स्वार्थासाठी केला जाणारा वापर यांतून 'शह-काटशह'चा खेळ वाचकाला सुन्न करतो. *कॉर्पोरेट विश्वाची ओळख करून देताना या क्षेत्रातील अधिकाऱ्याच्या भाषेत कादंबरी लिहिली असल्याने तिचे कथानक वाचकाला भावते.
* सहज आणि ओघवत्या शैलीतील कादंबरीचे कथानक वाचकांच्या डोळ्यांसमोरून एखाद्या चित्रपटाप्रमाणे सरकत जाते. हे लेखकाच्या लेखनशैलीचे यश आहे.
* 'मॅनेजमेंट माफिया' ही याच विषयावरील पहिली कादंबरीही इतकीच वाचनीय आहे.


लेखकाविषयी माहिती : लेखक संजय सुखटणकर हे पुणे विद्यापीठाच्या शास्त्र, कायदा आणि बिझिनेस मॅनेजमेंट या विषयांचे पदवीधर आहेत. त्यांनी 'प्रीमियर ऑटोमोबाइल्स,' 'जॉन्सन अँड जॉन्सन,' 'क्रॉम्प्टन ग्रीव्हज्, 'सीबा-गायगी', स्टँडर्ड चार्टर्ड बँक आणि ज्युबिलंट या नामवंत कंपन्यांमध्ये व्यवस्थापक म्हणून काम केले. 'सेंचुरी एन्का' या कंपनीतून उपाध्यक्ष म्हणून ते निवृत्त झाले. सुखटणकर यांनी 'अल्लाना', 'सिंहगड' आणि 'इंदिरा' या प्रमुख मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये आठ वर्षे प्राध्यापक म्हणूनही काम केले आहे. सकाळ व अन्य मराठी वृत्तपत्रांमध्ये ‘कामगार कायदा’ याविषयावर विपुल लेखन केले आहे. ‘कामगार कायदे’, 'सुधारित कामगार कायदे', ‘मॅनेजमेंट माफिया’ ही कादंबरी प्रकाशित झाली आहे.

Features

PublisherSakal Prakashan
AuthorSanjay Sukhtankar
LanguageMarathi
ISBN978-93-48048-10-3
BindingPaperback
Pages282
Publication Year07/10/2024
Dimensions5.5 x 8.5

Reviews

Write a review

Sadebara Lakhanchi Khandani

Sadebara Lakhanchi Khandani

कार्पोरेट जगातील सत्य घटनांवर आधारित असलेली संजय सुखटणकर लिखित साडेबारा लाखांची खंडणी ही कादंबरी!

Customers who bought this product also bought:

  • OK... Sorry... Thank You!

    साहित्याच्या आणि व्यंगचित्रांच्या जगात आपले...

    ₹ 299