Tantotant - Julvun Ghetana

BK00845

New product

₹ 450 tax incl.

More Info

कोणतीही दोन माणसे, मग ते नवरा-बायको असोत, पालक-मुले असोत, बहिण-भावंडे असोत, मित्र-मैत्रिणी असोत, अगदी जुळी भावंडे असोत, प्रत्येकजण वृत्ती, स्वभाव, आवडी-निवडीने वेगळा असतो. त्यामुळे तंतोतंत कुणीच जुळत नाही. त्यासाठी जीवनात आपल्याला सतत तडजोड करावी लागते. दोन व्यक्तींमध्ये जितकी जास्त तडजोड वृत्ती, जितका जास्त एकमेकांना प्रतिसाद, तितका अधिक सुसंवाद. एकमेकांशी जुळवून घेत असताना तंतोतंतपणा यावा असा प्रयत्न व्यक्ती करत असते. त्यातूनच जीवन सुलभ होते. याच मुद्द्यांशी संबंधित लेख या पुस्तकात वाचायला मिळतील. यातला प्रत्येक लेख वेगवेगळ्या विषयांवरचा आहे. तरीही, तो आपल्या जगण्याशी अत्यंत जवळचा आहे. आयुष्यात कराव्या लागणाऱ्या तडजोडी कुठे महत्त्वाच्या आहेत आणि कुठे अनावश्यक आहेत, याचे मार्गदर्शन या पुस्तकातून होईल.

मंगला सामंत या समाजशास्त्राच्या अभ्यासक आहेत. गेली ३५ वर्षे Anthropology, Evolution, Biology, Neurology, Psychology, History वगैरे विषयांच्या अभ्यासाचा समाजशास्त्राशी सांगड घालणारे आणि सामाजिक प्रश्नाकडे लक्ष वेधणारे लेखन त्यांनी केले आहे. विविध वृत्तपत्रातही त्यांनी सामाजिक व ऐतिहासिक विषयांवर लेखन केलेले आहे.

Features

PublisherSakal Prakashan
AuthorMangala Samant
LanguageMarathi
ISBN978-93-48048-23-3
BindingPaperback
Pages312
Publication Year21/10/2024
Dimensions5.5 x 8.5

Reviews

Write a review

Tantotant - Julvun Ghetana

Tantotant - Julvun Ghetana