BK00956
New product
जंगल पर्यटनाचा आनंद घ्यायचा तर जंगल बघणं शिकावं लागेल. जंगल कसं बघायचं, कसं अनुभवायचं यासाठी अनुज खरे यांचं 'साद रानवाटांची : भारतातील अरण्यांच्या भटकंतीसाठी सोबती' हे पुस्तक वाचायलाच हवं.
Warning: Last items in stock!
Availability date:
Saad Ranvatanchi : Bharatatil Aranyanchya Bhatkantisathi Sobati
जंगल पर्यटनाचा आनंद घ्यायचा तर जंगल बघणं शिकावं लागेल. जंगल कसं बघायचं, कसं अनुभवायचं यासाठी अनुज खरे यांचं 'साद रानवाटांची : भारतातील अरण्यांच्या भटकंतीसाठी सोबती' हे पुस्तक वाचायलाच हवं.
Recipient :
* Required fields
or Cancel
आपला परिसर, जंगल कसं बघायचं हे आपण कधी शिकलेलोच नसतो. त्यामुळेच कदाचित जंगलात किंवा एखाद्या शांत, निवांत ठिकाणी गेल्यावर लोक विचित्र वागताना दिसतात. कुणी मोठमोठ्यांदा गाणी लावतं, कुणी जोरजोरात गप्पा मारताना दिसतं. त्यामुळे आजूबाजूची शांतता, पक्ष्यांचे आवाज अनुभवता येतच नाहीत. वाघ, सिंहासारखे जंगली प्राणी बघायचे तर शांतता लागते, संयम बाळगावा लागतो; हे सगळं माणसांना कसं कळावं? प्रत्येक जंगलाचे किंवा वातावरणाचेही काही नियम असतात. हे नियम पाळले तर निसर्ग सुरक्षित राहील आणि त्याचवेळी माणूसही सुखी होईल.
कुठल्या जंगलात काय बघाल, कोणते प्राणी, पक्षी प्रसिद्ध आहेत, त्या त्या जंगलाची एखादी विशेष गोष्ट यात वाचायला मिळेल. सोबतीला अनेक उत्तम छायाचित्र असल्यामुळे जंगलाची एक झलकही पाहायला मिळेल.
निसर्ग पर्यटनाची आवड असणाऱ्यांसाठी हे पुस्तक पर्वणी ठरेल तर ज्यांना निसर्गात भटकंती करायची आहे, निसर्ग समजून घ्यायचा आहे त्यांच्यासाठी हे पुस्तक म्हणजे उत्तम सोबती ठरेल.
लेखकाविषयी :
अनुज सुरेश खरे हे कॉमर्स पदवीधर असून महाराष्ट्र राज्य वन्यजीव सल्लागार मंडळाचे ते सदस्य आहेत. पुणे जिल्ह्यात मानद वन्यजीव रक्षक म्हणून सलग सहा वर्षे त्यांनी काम पाहिले आहे. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर भारतीय जैवविविधता या विषयावर ५०० हून अधिक व्याख्यानं त्यांनी दिली आहेत. तर याच विषयावर विविध शाळा, महाविद्यालयांत ५००हून अधिक स्लाईड शोज केले आहेत. नेचर वॉक आउटडोअर्स आणि सफारीज अनलिमिटेड या निसर्ग पर्यटन या विषयांत काम करणाऱ्या दोन संस्थांचे संचालक.
Publisher | Sakal Prakashan |
Author | Anuj Suresh Khare |
Language | Marathi |
ISBN | 978-93-48048-27-1 |
Binding | Paperback |
Pages | 256+8 |
Publication Year | 25/10/2024 |
Dimensions | 5.5 x 8.5 |