BK00998
New product
चमत्कार आणि किमयांबरोबरच मानवीय दृष्टिकोनातून श्रीगजानन महाराजांच्या जीवनकार्याचा वेध घेणारा चरित्रग्रंथ योगियांचा राणा.
Warning: Last items in stock!
Availability date:
Yogiyancha Rana
चमत्कार आणि किमयांबरोबरच मानवीय दृष्टिकोनातून श्रीगजानन महाराजांच्या जीवनकार्याचा वेध घेणारा चरित्रग्रंथ योगियांचा राणा.
Recipient :
* Required fields
or Cancel
शेगावचे संत गजानन महाराज म्हणजे भक्तांच्या कल्याणासाठी अवतरलेले अवलिया. ते शेगावमधील एका सद्गृहस्थाला उकिरड्यावर टाकलेले अन्न आणि गढूळ पाणी पिताना दिसले. चांगले अन्न व पाणी त्यांच्यासमोर ठेवूनही निर्मोही वृत्तीने त्यांनी सारे अन्न एकत्र करून खाल्ले आणि गढूळ आणि स्वच्छ पाणी असा भेद आमच्या ठायी नाही. सारे काही एकच असा अद्वैताचा बोध त्यांनी केला. त्यांनी लोककल्याणासाठी केलेले असंख्य चमत्कार आणि त्यांनी दिलेली शिकवण तसेच त्यांच्या भक्तांना आलेल्या प्रत्यक्षानुभवांचा समावेश या जीवनचरित्रामध्ये केला आहे. देहत्याग केल्यानंतरही गजानन महाराज भक्तांना मार्गदर्शन करतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. गजानन महाराज संस्थानाचे कार्यही या चरित्रग्रंथात विशेषत्वाने नमूद करण्यात आले आहे.
लेखकाविषयी : मूळ कवी प्रवृत्तीच्या असलेल्या राजलक्ष्मी देशपांडे यांना बालवयापासून अनेक संतसज्जन आणि विद्वानांना प्रत्यक्ष पाहण्याची व त्यांचे विचार ऐकण्याची संधी मिळाली. हा वारसा त्यांनी जपला व वाढवला. भाविकता आणि अभ्यासपूर्ण चिंतन यांचा संगम त्यांच्यामध्ये झालेला दिसतो. अनेक संतचरित्रांचे लेखन त्यांनी अभ्यासपूर्ण शैलीत केले आहे. त्यांचे कवितासंग्रह व लेखसंग्रहही प्रकाशित झाले आहेत.
जनतेच्या मनातील व्यथांची जाण ठेवून त्यांचा आवाज...
₹ 249
Embark on a transformative spiritual journey...
₹ 499
साहित्याच्या आणि व्यंगचित्रांच्या जगात आपले...
₹ 299
आपल्या भवतालाला कॅमेऱ्यासारखं वेगवेगळ्या अँगलने...
₹ 200
अमृता गणेश खंडेराव यांचे हे मनस्वी लिखाण प्रथमच...
₹ 290
झेनचे तत्त्वज्ञान गूढ आणि जटिल नाही; तर ते...
₹ 250