BK00675
New product
Warning: Last items in stock!
Availability date:
Karmayog
Recipient :
* Required fields
or Cancel
स्वामी विवेकानंदांची उत्कट इच्छा होती की भारताने आपले पूर्वीचे गौरवाचे स्थान पुनः प्राप्त करून घ्यावे. हे उद्दिष्ट साधण्यासाठी ते नेहमी आपल्या व्याख्यानांतून 'कर्मयोगा'चे महत्त्व सांगत असत. हे पुस्तक कर्मयोगावरील त्यांच्या १८९५-९६च्या हिवाळ्यात न्यूयॉर्क शहरात दिलेल्या प्रसिद्ध व्याख्यानांचा संग्रह आहे. मनुष्याला निष्क्रिय करणाऱ्या तमोगुणाचा नाश करून त्याला ध्येयाभिमुख करावे. 'ऋग्वेदा'तील 'आत्मनो मोक्षार्थं जगद्धिताय च’ या श्लोकाचा आदर्श समोर ठेवून सर्वांनी आत्मज्ञान आणि लोकहित हे दोन्ही साधावी, असे स्वामी विवेकानंदांना अगदी मनापासून वाटत असे आणि हीच शिकवण त्यांनी आपल्या व्याख्यानांतून दिली आहे. त्यांचे स्वतःचे जीवन म्हणजे या ध्येयप्राप्तीचे प्रत्यक्ष उदाहरण; म्हणूनच त्यांच्या शब्दांत अपार शक्ती साठलेली आहे. स्वामी विवेकानंदांची मार्गदर्शक ठरणारी दिव्य आणि ओजस्वी वाणी यांची अनुभूती पुस्तकरूपाने वाचकांना मिळणार आहे.
लेखकाविषयी माहिती : स्वामी विवेकानंदांचा जन्म १२ जानेवारी, १८६३ला उत्तर कोलकत्ता सिमलापल्ली येथे झाला. त्यांचे नाव नरेंद्र ठेवण्यात आले. एक भारतीय संन्यासी आणि तत्त्वज्ञ होते. रामकृष्ण परमहंस यांचे ते शिष्य होते. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात हिंदू धर्माला प्रमुख जागतिक धर्माच्या दर्जात आणून आंतरधर्मीय जागरूकता वाढवण्याचे श्रेय विवेकानंदांना दिले जाते. १८९३मध्ये शिकागो येथील जागतिक धर्माच्या परिषदेत हिंदू धर्माचा परिचय दिला. ४ जुलै १९०२ला त्यांनी कोलकात्याजवळील बेलूर मठात समाधी घेतली.
Publisher | Sakal Prakashan |
Author | Swami Vivekanand |
Language | Marathi |
ISBN | 9789348048875 |
Binding | Paperback |
Pages | 134 |
Publication Year | 06/12/2024 |
Dimensions | 5.5 x 8.5 |
आस्तिक असो वा नास्तिक, वा अज्ञेयवादी, साधक असो...
₹ 399
दैनंदिन जीवनासाठी उपयुक्त ठरणारे,...
₹ 299
झेनचे तत्त्वज्ञान गूढ आणि जटिल नाही; तर ते...
₹ 250
व्यक्तिमत्त्वाचे वेगवेगळे पैलू हिऱ्यासारखे कसे...
₹ 220
₹ 185