BK01001
New product
भारतीय खगोलशास्त्राच्या आणि भारतीय संस्कृतीच्या प्राचीन इतिहासाची जाणीव करून देणारे पुस्तक.
Warning: Last items in stock!
Availability date:
Pracheen Bharatiya Khagolvidnyan
भारतीय खगोलशास्त्राच्या आणि भारतीय संस्कृतीच्या प्राचीन इतिहासाची जाणीव करून देणारे पुस्तक.
Recipient :
* Required fields
or Cancel
‘भारत विद्या’ अर्थात ‘इंडॉलॉजी’ हा विषय अभ्यासकांबरोबरच सर्वसामान्य वाचकांसाठी नेहमीच कुतूहलाचा ठरतो. प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये आढळणाऱ्या माहितीविषयी बहुसंख्य वाचकांना उत्सुकता असते. त्यामुळेच पुस्तके, व्याख्याने, इंटरनेट अशा विविध माध्यमांतून प्राचीन संस्कृतीतील ज्ञानाचा धांडोळा घ्यायचा प्रयत्न जगभरातले अभ्यासक करत असतात.
प्रस्तुत पुस्तकात रामायण आणि महाभारत या मानवजातीच्या ‘इतिहास ग्रंथां’तील खगोलशास्त्रीय पुराव्यांची थोडक्यात मांडणी केली आहे; ऋग्वेद, सूर्यसिद्धान्त आदी ग्रंथांसोबतच नद्यांचा भूगोल आणि त्यांच्या प्रवाहातील बदलांचा अभ्यास, प्राचीन वास्तूंचा अभ्यास यातून भारतीय ज्ञानसंस्कृतीचा आवाका मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
भारतीय खगोलशास्त्राच्या आणि भारतीय संस्कृतीच्या प्राचीन इतिहासाची जाणीव करून देणे हा या पुस्तकाचा उद्देश आहे. इंडॉलॉजीच्या अभ्यासातील रूढीवादी दृष्टिकोनापासून मुक्त होऊन, प्राचीन भारतीय ज्ञानविश्वाचा अभ्यास मुळातून करण्याची प्रेरणा आणि प्रोत्साहन प्राचीन भारतीय खगोलशास्त्र या पुस्तकामुळे मिळेल, याची खात्री वाटते.
लेखकांविषयी :
नीलेश नीलकंठ ओक
‘रासायनिक अभियांत्रिकी’मध्ये एम. एस.; एक्झिक्युटिव्ह एमबीए
संशोधक, लेखक, TEDx वक्ता, UDCT-ICTचे नावाजलेले माजी विद्यार्थी आणि उत्तम वक्ता म्हणून लोकप्रिय
भारतीय संस्कृतीतील अद्भुत ज्ञान, तंत्रज्ञान आणि भारतीय संस्कृतीच्या प्राचीनतेचे भान देतात. कुशाग्र बुद्धी, वस्तुनिष्ठ पुरावा, शास्त्रीय आणि तार्किक कारणमीमांसेतून युक्तिवाद मांडणी
जगातील अनेक संस्कृतींचा आणि अनेक विषयांचा सखोल अभ्यास
इन्स्टिट्यूट ऑफ अॅडवान्स्ड सायन्सेस, डार्टमाऊथ, मॅसाच्यु सेट्स येथे संशोधक आणि अधिवक्ता प्राध्यापक
त्यांच्या मूलभूत संशोधनावर आधारित When did the Mahabharata War Happen?, The Historic Rama, Bhishma Nirwana ही तीन क्रांतिकारक पुस्तके प्रकाशित. या पुस्तकांची विविध भाषांत भाषांतरे झाली आहेत आणि होत आहेत.
संपूर्ण जगभर भरपूर प्रवास करत, विविध नामांकित विद्यापीठे आणि महाविद्यालये यांतील विद्यार्थ्यांशी, तसेच इतर अनेक अभ्यासक – श्रोत्यांशी संवाद साधत असतात.
त्यांच्या संशोधनाने कादंबऱ्या, माहितीपट आणि चित्रपटांना प्रेरणा दिली आहे.
रूपा भाटी
वास्तुविशारद आणि साहाय्यक प्राध्यापक
इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हासड् सायसेन्स, डार्टमाउथ, मॅसाच्युसेट्स
सूर्यसिद्धान्त, वेदांग ज्योतिष आणि इतर प्राचीन भारतीय संस्कृत ग्रंथांचा अभ्यास. पुरातत्त्वशास्त्रात विस्तृत शोधनिबंध प्रसिद्ध. गेल्या ३० वर्षांपासून ऋग्वेदाचा मानवी उत्क्रांतीसंबंधित अभ्यास.
वास्तुरचनाशास्त्र आणि पुरातत्त्वशास्त्र विषयक विवध कार्यक्रम.
पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन कार्यात सहभाग. कच्छ परिसरात २००० झाडे लावली. गांधीधाम डेव्हलपमेंट अथॉरिटीमध्ये मुख्य वास्तुविशारद
म्हणून काम करताना प्रत्येक घरात एक झाड लावणे बंधनकारक केले.
फावल्या वेळात कॅनव्हास पेंटिंग. मुंबई, दिल्ली आणि गांधीधाम येथे चित्रप्रदर्शने. मान्यवर आणि समीक्षकांकडून त्यांच्या कामाची प्रशंसा.
२०००मधील विनाशकारी भूकंपानंतर, गांधीधाम शहराला पूर्व पदावर आणण्यासाठी, शहर विकास समिती आणि विविध स्वयंसेवी संस्थांसोबत
अथक परिश्रम. असोसिएशन फॉर वुमन इन आर्किटेक्चर (AWA), यूएसए यांनीही या कार्याची दखल घेतली.
हेगच्या ‘इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ हाउसिंग अँड प्लॅनिंग’च्या (IFHP) त्या सन्माननीय सदस्या आहेत.
लीना आनंद दामले
M.Sc. (Nuclear Physics), जर्मन भाषा प्रशिक्षण तीन वर्षांचा अभ्यासक्रम.
कथा रूपी खगोलशास्त्र, अंतरिक्षाच्या अंतरंगात, नक्षत्रकथा ही पुस्तके प्रकाशित. सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ Michio Kaku यांच्या Physics of The Impossible या पुस्तकाचे अशक्य भौतिकी या नावाने अनुवादित पुस्तके प्रकाशित.
मराठी विश्वकोशात खगोलशास्त्रविषयक नोंदी.
नामवंत दैनिके, मासिके यांतून लेखमाला प्रकाशित.
‘आकाशवाणी’साठी विज्ञानविषयक लेखन
कथारूपी खगोलशास्त्र : राज्य शासनाचा उत्कृष्ठ वाङ्मयाचा राजा केळकर पुरस्कार (२००६).
मुलांसाठीचा कथासंग्रह नक्षत्रकथा राज्यशासनातर्फे सर्व शाळांमध्ये वितरित.
विज्ञानलेखनासाठी श्री. म. ना. गोगटे पुरस्कृत कै. गो. रा. परांजपे विशेष ग्रंथकार पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे (२०१९)
India International Science Festival येथे खगोलशास्त्र आणि पुराणकथा यावर एक सत्र घेण्यासाठी आमंत्रण.
टोकियो (जपान) येथे २००९मध्ये झालेल्या आशियाई देशांच्या खगोलशास्त्राशी संबंधित पुराणकथा यावरच्या Stars of Asia या कार्यशाळेत भारताचे प्रतिनिधित्व.
Publisher | Sakal Prakashan |
Author | Nilesh Nilkanth Oak, Roopa Bhaty, Leena Damle |
Language | Marathi |
ISBN | 978-93-48048-25-7 |
Binding | Paperback |
Pages | 144 |
Publication Year | 06/12/2024 |
Dimensions | 5.5 x 8.5 |