BK00844
New product
Warning: Last items in stock!
Availability date:
Adhunik Krushi Awajare Wa Yantre
Recipient :
* Required fields
or Cancel
जमीन मशागत, पेरणी, पुनर्लागवड आणि पीक काढणीसाठी विविध प्रकारची अवजारे आणि यंत्रे शेतकऱ्यांच्या रोजच्या वापरात असतात. सध्या शेतीत जाणवणाऱ्या मजुरांच्या कमतरतेमुळे ही अवजारे वापरली जातात. त्यामुळेच शेतीमधले यांत्रिकीकरण महत्त्वाचे ठरत आहे. तरीही, शेतीमध्ये यांत्रिकीकरणाचा अवलंब करण्यात अनेक आव्हाने आहेत. अवजारांबद्दलचे अज्ञान हे त्यातले प्रमुख आव्हान आहे.
ऊस, कपाशी, सोयाबीन, फळबागा यांसाठी उपयुक्त ठरणारी अवजारे आणि यंत्रे तसेच महिलांचे श्रम कमी करणारी अवजारे अशा विविध प्रकारच्या अवजारांविषयीची माहिती या पुस्तकात वाचायला मिळेल.
विशेष म्हणजे, शेतकऱ्यांना आता एकाच ठिकाणी विविध कृषी अवजारे, यंत्रे, याविषयीची सर्व माहिती उपलब्ध होणार आहे. अवजारांची देखभाल आणि ट्रॅक्टरची कार्यक्षमता याविषयीची माहितीही या पुस्तकात सविस्तर वाचायला मिळेल. त्यादृष्टीने सर्वसामान्य शेतकरी ते प्रगतिशील शेतकऱ्यांपर्यंत सर्वांसाठीच हे पुस्तक महत्त्वाचे ठरते. अवजारांविषयीचे अज्ञान दूर व्हावे म्हणूनच डॉ. तुळशीदास बास्टेवाड यांचे आधुनिक कृषी अवजारे व यंत्रे हे पुस्तक महत्त्वाचे ठरते.
लेखकाविषयी :
लेखक डॉ.तुळशीदास बास्टेवाड महात्मा फुले कृषि विद्यापीठात प्राध्यापक व प्रमुख संशोधक आहेत. कृषी शक्ती व यंत्रे अभियांत्रिकी या क्षेत्रातील शिक्षण, संशोधन, विस्तार, चाचणी व प्रशिक्षण इत्यादीचा २५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव तसेच, कृषि शक्ती व यंत्रे अभियांत्रिकीतील विविध प्रकल्पांमध्ये प्राध्यापक व प्रमुख संशोधक आणि चाचणी अभियंता म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. २८ संशोधनपर लेख, २३ तांत्रिक संशोधनपर लेख, १०९विस्तार लेख, १८ विस्तार बुलेटीन प्रकाशन, ३ पुस्तके प्रसिद्ध आहेत. १० राष्ट्रीय पुरस्कारही त्यांनी मिळवलेले आहेत.
Publisher | Sakal Prakashan |
Author | Dr. Tulshidas Bastewad |
Language | Marathi |
ISBN | 978-93-48048-35-6 |
Binding | Paperback |
Pages | 138 |
Publication Year | 10/12/2024 |
Dimensions | 7 x 9.5 |
दहा प्रमुख उपनिषदांमधील कथा, प्राचीन शिक्षण...
₹ 140