Khau Ha Purwoon Theva

BK00792

New product

'खाऊ हा पुरवून ठेवा' हा बालकवितासंग्रह असून यामध्ये मुलांचे भावविश्व व्यापलेल्या अनेक विषयांवर कवीने मुक्तछंदातल्या; परंतु सहज गाऊन म्हणता येतील अशा कविता लिहिल्या आहेत.  

More details

₹ 130 tax incl.

More Info

प्रबोधन करणे हा सिनकरांच्या कवितांचा गाभा आहे. बालमनाचे प्रबोधन करताना ते कवितेतून आईची माया, वडिलांचे प्रेम, पर्यावरणाचे महत्त्व, शिक्षणाची गरज आणि कालबाह्य होत चाललेल्या पत्रलेखनाचे महत्त्वही अधोरेखित करतात.   
मंगेश पाडगावकर म्हणतात तसं, जी कविता मुलांना आवडते, त्यांना ती पुन्हा पुन्हा वाचावीशी वाटते, ती मुलांसाठी लिहिलेली कविता असते. अगदी तसाच प्रयत्न डॉ. विनोद सिनकर यांनी आपल्या कवितांमधून केलेला आहे.      
या कवितांमधून बालमित्रांना आई-बाबा, आजी-आजोबा, ताई-दादा, वर्ग-मित्र, शाळा-शिक्षक, झाडे, वेली, फळे, पाने, फुले, डोंगर, नद्या असं सगळं अनुभवायला मिळतं.  
मुलांशी रोज वेगवेगळ्या निमित्ताने होणाऱ्या संवादातून लेखकाने या कविता लिहिल्या असल्याने त्या बाल आणि कुमार या दोन्ही वयोगटातल्या मुलांसाठी उपयुक्त आहेत.
बालकांच्या बदलत्या भावविश्वाशी नाते जोडतानाच त्यांच्या मानसिक, भावनिक आणि बौद्धिक विकासात या कविता नक्कीच भर घालणाऱ्या आहेत. 
या संग्रहात कवितांसह बोलक्या चित्रांचाही समावेश आहे.  

लेखकाविषयी :
डॉ. विनोद सिनकर हे एक कृतिशील, प्रेमळ, संवेदनशील आणि विद्यार्थीप्रिय शिक्षक आहेत. 
किशोर, मुलांचे मासिक, खेळगडीसह अनेक मासिकांत व किशोर, बालकुमार, ऋग्वेद, ज्योत, हुप्पा हुय्या अशा दिवाळी अंकांमध्येही त्यांनी लेखन केलं आहे.  
तसेच महाराष्ट्र शासनाच्या अनेक शैक्षणिक पुस्तकांचे, ग्रंथांचे संपादक म्हणूनही डॉ. विनोद सिनकर यांनी काम पाहिलं आहे.    
बालकांसाठी घेतली जाणारी शिबिरे, कार्यशाळा आणि संमेलनामध्ये ते आवर्जून सहभाग घेतात. बऱ्याच बालसाहित्य संमेलनामध्ये त्यांना वक्ता म्हणून बोलावले जाते. 
'आदर्श शिक्षक' अशी ओळख असणाऱ्या डॉ, विनोद सिनकर यांना साने गुरुजी स्फूर्ती सन्मान पुरस्कार, अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेचा बालसाहित्य राज्य पुरस्कार असे नामंकित पुरस्कारही मिळाले आहेत.

Features

PublisherSakal Prakashan
AuthorDr. Vinod Sinkar
LanguageMarathi
ISBN978-81-19311-37-8
BindingPaperback
Pages92
Publication Year16/12/2024
Dimensions5.5 x 8.5

Reviews

Write a review

Khau Ha Purwoon Theva

Khau Ha Purwoon Theva

'खाऊ हा पुरवून ठेवा' हा बालकवितासंग्रह असून यामध्ये मुलांचे भावविश्व व्यापलेल्या अनेक विषयांवर कवीने मुक्तछंदातल्या; परंतु सहज गाऊन म्हणता येतील अशा कविता लिहिल्या आहेत.