New Shuddhipatra

Shuddhipatra

BK01012

New product

This product is no longer in stock

₹ 299 tax incl.

More Info

समाजातील ज्या घटकांवर पिढ्यान् पिढ्या अन्याय झाला, त्या घटकांना न्याय्य वागणूक मिळावी, म्हणून भारतीय संविधानाने अनुसूचित जाती- जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा पारित केला. अल्पसंख्यांक समाजाच्या रक्षणासाठीही विशेषत्वाने कायदे करण्यात आले. त्यामुळे त्या त्या समाज घटकांचे अवमानकारक उल्लेख कायद्याच्या कचाट्यात आपसूकच आले. पण शब्दकोशासारख्या भाषिक वैभवामध्ये जातिवाचक उल्लेख अर्थासह दिल्याने कोणाचा अपमान होऊ शकतो? भावना दुखावतात? भाषांवर निरतिशय प्रेम असलेल्या एका तज्ज्ञाने शब्दकोशातील 'ते' सहा शब्द वगळले जाऊ नयेत, म्हणून दिलेल्या कायदेशीर लढ्याचे चित्रण करणारी ही सामाजिक कादंबरी आहे.

लेखकाविषयी : मराठीतील अव्वल दर्जाचे कथाकार व कादंबरीकार म्हणून परिचित. प्रवासवर्णन, स्फुटलेखन, नाटक, इत्यादी साहित्यप्रकारांतही लेखन. अनेक लघुकथा व दीर्घकथांचे लेखन. त्यांच्या अनेक कादंबऱ्यांचे भारतीय भाषांमध्ये अनुवाद. १९८८ ते १९९२ या कालावधीत अखिल भारतीय मराठी साहित्प महामंडळाचे अध्यक्ष आणि १९९५ ते २००६ या कालावधीत महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे या संस्थेचे अध्यक्षपदगंगार्पण', 'कृष्णजन्म', 'लांडगा' या कथासंग्रहांना राज्यशासनाने सर्वोत्कृष्ट कथासंग्रह पुरस्कार तर 'अखेरचे आत्मचरित्र' या कादंबरीला राज्यशासनाचा सर्वोत्कृष्ट कादंबरी पुरस्कार. याखेरीज, ना.सी. फडके पुरस्कार, ह.ना. आपटे पुरस्कार, शंकर पाटील पारितोषिक, आनंदीबाई शिर्के पारितोषिक, श्री. दा. पानवलकर पुरस्कार अशा अनेक साहित्यविषयक पुरस्कारांचे मानकरी. महाराष्ट्र राज्य गुजराथी अकादमीतर्फे उत्कृष्ट साहित्य निर्मितीसाठी देण्यात येणारा वर्ष २०२२- २३ साठीचा कवी नर्मद मराठी साहित्प पुरस्कार प्राप्त

Features

PublisherSakal Prakashan
AuthorRajendra Banhatti
LanguageMarathi
ISBN978-93-48048-17-2
BindingPaperback
Pages184
Publication Year07/01/2025
Dimensions5.5 x 8.5

Reviews

Write a review

Shuddhipatra

Shuddhipatra