Kasa Huin Tan Hu Mai...

BK00987

New product

₹ 240 tax incl.

More Info

ग्रामीण भागातल्या आयुष्याबद्दल सगळ्यांच्या मनात नेहमीच उत्सुकता असते. त्यातही या भागातल्या बाकी कुणापेक्षाही बाईचं आयुष्य कसं चालतं हे विशेषत्वाने जाणून घ्यायला सगळ्यांनाच आवडतं. ग्रामीण कष्टकरी महिलेचं जीवन आजही चूल-मूल आणि भाकरी या त्रिकोणात बंदिस्त आहे.
सुनांच्या कामाविषयी बोलताना तर #कसं_हुईन_तं_हू_माय हे वाक्य तर ग्रामीण भागातील सासवा दिवसातून दहा वेळा उच्चारतात. या सुनेमुळे माझ्या मुलाचं कसं होईल - असा याचा सरळ साधा अर्थ. आपल्या मुलाची काळजी करताना त्या आई-वडील, घरदार सगळं सोडून आलेल्या सुनेची अजिबातच काळजी करत नाहीत.
या पुस्तकात असंच जिणं जगणाऱ्या बायकांच्या संघर्षाच्या आणि जिद्दीच्या कहाण्या वाचायला मिळतील. बाईचं जगणं डोळ्यासमोर उभं राहतंच शिवाय प्रसंगी घडणारा विनोद आपल्या चेहऱ्यावर हसू आणतो. यातून वऱ्हाडी बोलीची एक वेगळीच लज्जत अनुभवायला मिळते. ही बोली वाचताना, काही शब्द म्हणून बघताना वाचकांना या बोलीची मजाही अनुभवता येईल. वऱ्हाडी बोली, ग्रामीण भागातील आयुष्याचा पट उलगडून दाखवणारं हे पुस्तक वाचावं असंच आहे.

लेखिकेविषयी :
कथा, कविता, ललित, वैचारिक, सामाजिक, पथनाटक, बालसाहित्य, गाणी, स्लोगन, जिंगल्स, जाहिरात लेखन असे लेखनाचे विविध प्रकार अमृता खंडेराव यांनी हाताळले आहेत. दै.सकाळ, मिळून साऱ्याजणी, सेवा दल पत्रिका अशा विविध वृत्तपत्र आणि मासिकांसाठी त्यांनी लेखन केले आहे.
* मागील दहा वर्षात ग्रामस्वच्छता अभियान, शेतकऱ्यांच्या समस्या, महिलांचे सामाजिक प्रश्न, पर्यावरण या विषयावर विद्यार्थ्यांच्या मदतीने पथनाट्ये सादर केली आहेत.
* ग्रामीण महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी कार्यरत, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलांचे प्रश्न, ग्रामीण विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहकार्य, ग्रामीण भागातील शाळा आणि बचत गट यांच्याबरोबर विविध विषयांवर काम.
* ग्रामीण भागातील महिलांना वेगवेगळ्या प्रकारची मदत मिळवून देण्यासाठी जवळपास १०० कार्यक्रमांचे आयोजन.
* विविध सामाजिक विषयांवरील कार्यक्रमांचे आयोजन.
* मागील दहा वर्षांपासून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना मोफत शैक्षणिक मार्गदर्शन.
* पाचशेहून अधिक पर्यावरणविषयक कार्यशाळांचे आयोजन.
* सामाजिक आणि जातीय सलोख्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन.

Features

PublisherSakal Prakashan
AuthorAmruta Khanderao
LanguageMarathi
ISBN978-93-48048-63-9
BindingPaperback
Pages184
Publication Year07/01/2025
Dimensions5.5 x 8.5

Reviews

Write a review

Kasa Huin Tan Hu Mai...

Kasa Huin Tan Hu Mai...