A to Z Dairy Farming

BK00963

New product

जागतिक स्तरावर झपाट्याने होणाऱ्या बदलांना व मागणीला अनुसरून भारतातील दूध उत्पादकांना स्वतःमध्ये आमूलाग्र बदल घडवण्याची वेळ आली आहे. त्यासाठी सर्व दूध उत्पादकांना नवनवीन व प्रात्यक्षिकांसह माहिती देणारे डॉ. पराग घोगळे आणि प्रशांत कुलकर्णी लिखित A to Z डेअरी फार्मिंग हे पुस्तक!

More details

₹ 400 tax incl.

More Info

दुग्धव्यवसाय सुरू करण्यासाठी प्रथमत: गायी-म्हशी विकत घेतल्यानंतर त्यापासून चांगल्या जातिवंत गायी-म्हशी आपल्या गोठ्यात तयार करण्यासाठी मुख्यत: ‘प्रजनन’, ‘जनावरांचा आहार’, ‘समग्र व्यवस्थापन’ आणि ‘दुधाचे गुणवत्ता नियंत्रण’ या चार गोष्टी महत्त्वाच्या असतात. त्या समजून घेऊन पुढील पाच वर्षांचा आराखडा तयार करणे आवश्यक असते. थोडक्यात दूध व्यवसायाकडून दूध उद्योजकतेकडे जाण्याच्या प्रवासासाठी मार्गदर्शक ठरणारे हे पुस्तक आहे.
जगभरात गायी-म्हशींच्या सुमारे ८०० प्रजाती आहेत. गायी-म्हशी २० वर्षांपर्यंत जिवंत राहू शकतात. गायीला एक नाही तर चार पोटे असतात. त्यांच्या पोटात कोट्यवधी सूक्ष्मजीव असतात. अशा अनेक रंजक गोष्टींचा उलगडा यांमधून होतो.
उपलब्ध तंत्रज्ञान, गुणवत्तापूर्ण उत्पादन व आधुनिक व्यवस्थापन आत्मसात करण्यासाठी हे पुस्तक दूध उत्पादक, शेतकरी, तरुणांना आणि अभ्यासकांना निश्चितच मार्गदर्शक ठरेल.

लेखकांविषयी माहिती :

डॉ. पराग घोगळे पशुआहारशास्त्र विषयात भारतात व भारताबाहेर काम करत आहेत. त्यांनी महाराष्ट्र शासन तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये काम केले आहे. ‘पशुआहार सल्लागार’ म्हणून जवळजवळ २१ वर्षे ते या क्षेत्रात कार्यरत आहेत. भारतातील दूध उत्पादक शेतकरी, सहकारी संस्था, डेअरी फार्म्स व फीड मिल्ससाठी तसेच पशुखाद्य उत्पादन कारखाने यांसाठी पशुआहार सल्लागार म्हणून काम करत आहेत. पशुआहार विशेषज्ञ म्हणून विविध माध्यमांतून गेली १० वर्षे ते लेखन करत आहेत.

प्रशांत कुलकर्णी हे गेली १६ वर्षे भारत व भारताबाहेरील व्यावसायिक डेअरी फार्म्समध्ये कार्यरत आहेत. त्यांनी ‘मारमुम डेअरी’, दुबई, ‘बलादना डेअरी’, कतार, ‘सा डेअरी’, आफ्रिका, येथे व्यवस्थापक म्हणून काम केले आहे, तसेच भारतातील ‘हॅपी मिल्कडेअरी’, तुमकुर, कर्नाटक, ‘प्रभात डेअरी’, श्रीरामपूर येथेही व्यवस्थापक म्हणून काम केले आहे.

Features

PublisherSakal Prakashan
AuthorDr. Parag Ghogale, Prashant Kulkarni
LanguageMarathi
ISBN978-93-48048-69-1
BindingPaperback
Pages190
Publication Year04/02/2025
Dimensions7 x 9.5

Reviews

Write a review

A to Z Dairy Farming

A to Z Dairy Farming

जागतिक स्तरावर झपाट्याने होणाऱ्या बदलांना व मागणीला अनुसरून भारतातील दूध उत्पादकांना स्वतःमध्ये आमूलाग्र बदल घडवण्याची वेळ आली आहे. त्यासाठी सर्व दूध उत्पादकांना नवनवीन व प्रात्यक्षिकांसह माहिती देणारे डॉ. पराग घोगळे आणि प्रशांत कुलकर्णी लिखित A to Z डेअरी फार्मिंग हे पुस्तक!

Customers who bought this product also bought: