Tal-Bhavtal

BK00966

New product

₹ 350 tax incl.

More Info

- ‘ताल-भवताल’ हा ज्येष्ठ साहित्यिक दादाभाऊ गावडे यांचा प्रकाशित होणारा दुसरा कथासंग्रह आहे.
- भीषण दारिद्र्य आणि भोगवट्याला आलेला काही दशकांचा संघर्ष यावर आधारलेल्या वास्तवांच्या विविध तऱ्हा मांडणाऱ्या कथा या संग्रहात आहेत.
- या संग्रहातील कथा गेल्या साठ वर्षांतले सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक वास्तव आणि परिस्थितीचे चिकित्सक चित्रण करणाऱ्या असून वाचकांना चिंतनास प्रवृत्त करणाऱ्या आहेत.
- जगलेल्या आणि भोगलेल्या भीषण अनुभवांचे चित्रण करताना कारुण्याचा आर्जवी स्वर आळवणाऱ्या या संग्रहातील कथा वाचकांना अस्वस्थ करतात.
- वास्तववादी चित्रण, रसाळ आणि सुलभ भाषा ही या संग्रहाची वैशिष्ट्ये आहेत.

लेखकाविषयी :
- दादाभाऊ गावडे हे ज्येष्ठ लेखक असून अनेक दशकांपासून साहित्यसेवा करत आहेत.
- ‘वसवा’ ही ग्रामीण कांदबरी, ‘वाटेवरची माणसं’ हा कथासंग्रह, ‘माती सांगे माणसाला, शोधिता विठ्ठल’ हे दोन कवितासंग्रह यासारखी बारा पुस्तके दादाभाऊंनी लिहिलेली असून ती वाचकप्रिय ठरलेली आहेत.
- २०१४ पासून दरवर्षी प्रकाशित होणाऱ्या ‘गोंदण’ या दिवाळी अंकाचे सहसंपादकपद दादाभाऊ यशस्वीपणे सांभाळत आहेत.
- महाराष्ट्र राज्य शासनाच्या कामगार मंत्रालयाने २०१९ मध्ये ‘गुणवंत साहित्यक कामगार’ म्हणून दादाभाऊ गावडे यांचा गौरव केलेला आहे.
- मराठीतील दिग्गज साहित्यिकांचा सहवास लाभलेले दादाभाऊ वाचन-लेखनाइतकेच सामान्य माणसात रमतात.

Features

PublisherSakal Prakashan
AuthorDadabhau Gawade
LanguageMarathi
ISBN9789348048790
BindingPaperback
Pages246
Publication Year03/01/2025
Dimensions5.5 x 8.5

Reviews

Write a review

Tal-Bhavtal

Tal-Bhavtal