Kathalankar

BK00806

New product

'कथालंकार' या लघुकथासंग्रहात लेखिका उर्मिला भुर्के यांनी स्त्रीच्या आयुष्यातील दागिन्यांचं महत्त्व आणि जिव्हाळा उलगडणाऱ्या कथा लिहिल्या आहेत.

More details

₹ 170 tax incl.

More Info

  • दागिन्यांविषयीचं प्रेम आणि स्त्रीजीवनाच्या विविध पैलूंचं चिंतन यांना एकत्र करून त्यांनी या संग्रहातल्या कथा गुंफल्या आहेत.
  • २०२१ मध्ये साप्ताहिक सकाळमधून त्यांनी सदर स्वरूपात दागिन्यांच्या माध्यमातून स्त्रियांचं भावविश्व रेखाटलं. त्याचंच पुस्तकरूप म्हणजे हा संग्रह.
  • यातल्या प्रत्येक कथेला जगण्याचं परिमाण आहे. या कथा आपल्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं शोधतात. जगण्यातला आनंद धुंडाळण्याचा प्रयत्न करतात. कथा वाचताना तो आनंद मनात हळुवार दरवळतो आणि हेच या कथांचं वैशिष्ट्य आहे.
  • लाघवी भाषा, उत्कट प्रसंगचित्रणं, मोजके आणि आटोपशीर संवाद यामुळे या लघुकथा विशेष वाचनीय झाल्या आहेत.  

लेखिकेविषयी :

- उर्मिला भुर्के यांनी इंग्लिश साहित्यात एम.ए. केलं असून त्या मूळच्या सांगली येथील आहेत.  
- उर्मिला भुर्के यांची ‘भावविश्व’ ‘मिस यू’ ‘स्मरणी’ ही तीन सदरे सकाळ ‘स्मार्ट सोबती’मधून प्रकाशित झालेली आहेत.
- त्या आहारशास्त्रातील डाएट डिप्लोमाधारक असून विविध पाकक्रिया स्पर्धांकरता परीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळतात.
- त्यांना वाचन आणि लेखनाची विशेष आवड असून भ्रमंती हाही त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे.

Features

PublisherSakal Prakashan
AuthorUrmila Vijay Bhurke
LanguageMarathi
ISBN978-93-48048-70-7
BindingPaperback
Pages100
Publication Year17/02/2025
Dimensions5.5 x 8.5

Reviews

Write a review

Kathalankar

Kathalankar

'कथालंकार' या लघुकथासंग्रहात लेखिका उर्मिला भुर्के यांनी स्त्रीच्या आयुष्यातील दागिन्यांचं महत्त्व आणि जिव्हाळा उलगडणाऱ्या कथा लिहिल्या आहेत.