Manapasoon Manatle

BK00954

New product

₹ 230 tax incl.

More Info

  • ‘मनापासून मनातले’ या कवितासंग्रहात कवी गोविंद कुळकर्णी यांनी प्रेम, निसर्ग आणि चिंतनपर कविता लिहिल्या आहेत.
  • सामाजिक घटितांवर केलेली चिंतनपर भाष्ये, कवी आणि कविता याविषयीचं चिंतन हे या संग्रहाचं एक प्रधान वैशिष्ट्य आहे.
  • या संग्रहातील अनेकविध कवितांमध्ये आठवांचे झरे, सुखाचं चांदणं, स्नेहगंधाची स्मरणशिल्पे आणि मावळतीचे हळवे कातर रंगही आहेत.
  • निसर्ग आणि मानवाचं नातं शोधणाऱ्या या संग्रहातील कविता मुक्तछंदातून उलगडते.
  • कोकणातल्या हिरव्यागर्द निसर्गाची लोभसचित्रेही या संग्रहातून अनुभवायला मिळतात.

कवीविषयी :

  • गोविंद कुळकर्णी सचोटीचे ग्रंथपाल असून त्यांनी जवळपास चार दशके ग्रंथसेवा केलेली आहे.
  • चोखंदळ वाचक असणाऱ्या कुळकर्णी यांना कविता आणि निसर्ग यात विशेष रुची आहे.
  • मूळचे कोकणवासी असणाऱ्या कुळकर्णी यांच्या साहित्यात कोकणाची विविध रूपे दृग्गोचर होतात.
  • वाचन, लेखन, नाटक, लोककला पाहणे आणि संगीत ऐकणे यात रमणाऱ्या या कवीचा सुखाचा निवारा कविता आहे.

Features

PublisherSakal Prakashan
AuthorGovind Anant Kulkarni
LanguageMarathi
ISBN9789348048950
BindingPaperback
Dimensions5.5 x 8.5

Reviews

Write a review

Manapasoon Manatle

Manapasoon Manatle