Majhi Atmakatha

BK00680

New product

डॉ. आंबेडकरांचे जीवनचरित्र म्हणजे भारताच्या समृद्ध इतिहासाचे आणि मानवी हक्कांसाठीच्या लढ्याचे द्योतक आहे. त्याचा हा संक्षिप्त आढावा!

More details

This product is no longer in stock

₹ 200 tax incl.

More Info

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेचे मुख्य शिल्पकार आणि भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक होते.
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 'कोलंबिया' विद्यापीठ आणि 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स' या शिक्षण संस्थांमधून अर्थशास्त्र विषयात 'विद्यावाचस्पती' पदव्या मिळविल्या; तसेच त्यांनी कायदा, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयांवर संशोधन केले.
  • डॉ. आंबेडकर भारताच्या स्वातंत्र्यासाठी वैचारिक प्रबोधन कार्यात सहभागी झाले. 'मूकनायक' (३१ जानेवारी १९२०), 'बहिष्कृत भारत' (३ एप्रिल १९२७), 'जनता' (२४ नोव्हेंबर १९३०, पहिला अंक) 'प्रबुद्ध भारत' (४ फेब्रुवारी १९५६) ही समाजप्रबोधनात्मक वृत्तपत्रे त्यांनी प्रकाशित केली.
  • दलितांसाठी राजकीय हक्कांचा व सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार त्यांनी केला, तसेच आधुनिक भारताच्या निर्मितीत महत्त्वपूर्ण योगदान त्यांनी दिले.
  • त्यामुळे डॉ. आंबेडकरांची २०१२मध्ये 'द ग्रेटेस्ट इंडियन' या सर्वेक्षणात 'सर्वश्रेष्ठ भारतीय' म्हणून निवड करण्यात आली.

लेखकाविषयी माहिती :

भीमराव रामजी आंबेडकर अर्थात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल, १८९१मध्ये मध्य प्रदेश मधील महू येथील सैनिक छावणीत झाला. रामजी व भीमाबाई या दांपत्याला चौदा अपत्ये होती. त्यांपैकी भीमराव हे चौदावे अपत्य होते. इ.स. १८९६मध्ये त्यांच्या आई भीमाबाईंचे निधन झाले, त्यावेळी भीमराव ५ वर्षाचे होते.
डॉ. आंबेडकर परदेशातून अर्थशास्त्रामध्ये डॉक्टरेट (पीएच.डी.) पदवी मिळवणारे पहिले भारतीय होते. तसेच ते दक्षिण आशियातून दोनदा डॉक्टरेट (पीएच.डी. व डी.एससी.) पदव्या मिळवणारे पहिले दक्षिण आशियाई होते. त्यांनी नोव्हेंबर, १८९६ ते नोव्हेंबर १९२३ अशा २७ वर्षांत मुंबई विद्यापीठ, कोलंबिया विद्यापीठ, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि ग्रेज इन या शिक्षण संस्थांमधून उच्च शिक्षण घेतले. दरम्यान बीए, दोनदा एमए, पी.एचडी, एमएस्सी, बार-ॲट-लॉ आणि डी.एस्सी. या पदव्या मिळवल्या. १९५०च्या दशकात त्यांना एलएल.डी. आणि डी.लिट. या दोन सन्माननीय पदव्या सुद्धा प्रदान करण्यात आल्या.
स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक होते. देशाच्या विविध क्षेत्रांत दिलेल्या योगदानामुळे त्यांना 'आधुनिक भारताचे शिल्पकार' किंवा 'आधुनिक भारताचे निर्माते' असेही म्हणतात.

Features

PublisherSakal Prakashan
AuthorDr. Babasaheb Ambedkar
LanguageMarathi
ISBN978-93-48048-31-8
BindingPaperback
Pages216
Publication Year01/03/2025
Dimensions5.5 x 8.5

Reviews

Write a review

Majhi Atmakatha

Majhi Atmakatha

डॉ. आंबेडकरांचे जीवनचरित्र म्हणजे भारताच्या समृद्ध इतिहासाचे आणि मानवी हक्कांसाठीच्या लढ्याचे द्योतक आहे. त्याचा हा संक्षिप्त आढावा!