Sant Surdas

Sirshree

New product

₹ 150 tax incl.

More Info

संत सूरदास हे केवळ एका कवीचं नाव नाही तर ते आहे, जगातील एका महान आश्चर्याचं! ज्याने हे सिद्ध केलं आहे, अनन्य भक्ती एखाद्या व्यक्तीला इतकी शक्ती देऊ शकते, की जन्मांध असूनही ती आपल्या आराध्य देवतेचं सुंदर वर्णन करू शकते. जसं सूरदासांनी कृष्ण लीलांचं केलं आहे.
ज्ञान आणि भक्तीने अंतर्मनाची दृष्टी स्पष्ट कशी होते, हे सूरदासांच्या मनोहर रचना वाचून समजतं.
सूरदासांनी वेद-पुराणात लिहिलेलं कठीण ज्ञान आणि भक्तीचं वर्णन आपल्या सोप्या ब्रजभाषेत अशा प्रकारे व्यक्त केलं आहे, जणू भक्त कृष्णाच्या नामामध्ये रंगूनच गेलेत.

लेखक परिचय :

सरश्रींचा आध्यात्मिक शोधाचा प्रवास त्यांच्या बालपणापासूनच सुरू झाला. जीवनाचे रहस्य समजण्यासाठी त्यांनी प्रदीर्घ काळ मनन करून आपले शोधकार्य सातत्याने सुरू ठेवले. या शोधातूनच त्यांना ‘आत्मबोध’ प्राप्त झाला. आत्मबोधप्राप्तीनंतर त्यांनी अध्यापनाचे कार्य थांबवले आणि जवळजवळ दोन दशकांहूनही अधिक काळ आपले समस्त जीवन मानवजातीच्या कल्याणासाठी आणि आध्यात्मिक विकासासाठी अर्पण केले.

आजपर्यंत त्यांनी आध्यात्मिक विषयांवर तीन हजारांहून अधिक प्रवचने दिली आहेत. या प्रवचनांद्वारे ते अध्यात्मातील अतिशय गहन संकल्पना सहज, सुलभ आणि व्यावहारिक भाषेत समजावून सांगतात. समाजातील प्रत्येक स्तरावरील मनुष्य सरश्रींद्वारे सांगितल्या जाणाऱ्या या समजेचा लाभ घेऊ शकतो. त्यासाठी कोणत्याही धर्म, जात, उपजात, वर्ण, पंथ वा लिंग यांचे बंधन नसते.

Features

PublisherSakal Prakashan
AuthorSirshree
LanguageMarathi
ISBN978-93-48048-60-8
BindingPaperback
Pages116
Publication Year05/03/2025
Dimensions5.5 x 8.5

Reviews

Write a review

Sant Surdas

Sant Surdas