Prakshobh

BK00964

New product

या कादंबरीत आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास आणि अतिवंचित असलेल्या कुटुंबातील एका शालेयवयीन मुलाने शिक्षणासाठी केलेल्या धडपडीची, ध्येयपूर्तीसाठी सोसलेल्या दाहक अनुभवांची प्रेरक सत्यकथा कथन केलेली आहे.

More details

₹ 499 tax incl.

More Info

‘जग बदल घालुनी घाव सांगून गेले मज भीमराव’ या लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा मानणाऱ्या या आत्मकथनात्मक कादंबरीत शिक्षण घेण्यासाठी आप्तस्वकीय आणि इतरांशी कराव्या लागलेल्या संघर्षाची गोष्ट सांगितलेली आहे.
जीवनातील अडचणींवर मात करून ‘तिमिराकडून तेजाकडे’ मार्गक्रमण कसे करावे याचा बोध आपल्याला या कादंबरीतून घेता येतो.
पाचवीला पूजलेली गरिबी, भोवतालची घोर नकारात्मकता, सामाजिक हिणवणूक, या भयाण वास्तवात अंगिकारलेली सकारात्मक जगण्याची उर्मी आणि झंझावाती संघर्षातून निर्माण झालेली ध्येयवेडी अभिलाषा या कादंबरीत दिसून येते.
‘रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांना’ साद घालत ‘उजेडाचे वारस’ होण्याची आकांक्षा बाळगणारी ही आत्मकथनात्मक कादंबरी वंचितांना शिक्षणासाठी प्रेरित आणि उद्युक्त करणारी आहे.

लेखकाविषयी :
लेखक डॉ. प्रकाश ज्ञानोबा जाधव हे मूळचे लातूरचे असून सध्या त्यांचे वास्तव्य अहमदनगर जिल्ह्यात आहे.
जाधव यांनी ‘मराठी साहित्य’ या विषयात एम.ए. नेट, सेट आणि पीच.डी या पदव्या मिलवल्या असून ते सध्या ‘प्रेमराज सारडा महाविद्यालय, अहमदनगर’ येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
गेल्या वीस वर्षांपासून अध्यापनासह सामाजिक क्षेत्रात लेखक कार्यरत असून ते आश्रमशाळेतील मुलांच्या प्रगतीसाठी सातत्याने विविध उपक्रमात सक्रिय योगदान देतात.
‘तिम्मा’ या कादंबरीसह मराठी साहित्याविषयी संशोधनात्मक मांडणी करणारी दोन पुस्तके त्यांनी लिहिली असून नजीकच्या काळात काही पुस्तके प्रकाशनाच्या मार्गावर आहेत.
डॉ. प्रकाश ज्ञानोबा जाधव यांना ‘राज्यस्तरीय पुरस्कार’, ‘अस्मितादर्श साहित्य पुरस्कार, ‘उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार’ यासारख्या विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

Features

PublisherSakal Prakashan
AuthorDr. Prakash Jadhav
LanguageMarathi
ISBN978-93-48048-53-0
BindingPaperback
Pages336
Publication Year10/03/2025
Dimensions5.5 x 8.5

Reviews

Write a review

Prakshobh

Prakshobh

या कादंबरीत आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास आणि अतिवंचित असलेल्या कुटुंबातील एका शालेयवयीन मुलाने शिक्षणासाठी केलेल्या धडपडीची, ध्येयपूर्तीसाठी सोसलेल्या दाहक अनुभवांची प्रेरक सत्यकथा कथन केलेली आहे.