Aitihasik Wade Va Gharani

BK01013

New product

₹ 599 tax incl.

More Info

छत्रपती शिवरायांचे सरसेनापती माणकोजी दहातोंडे ते शेवटचे पेशवे दुसरे बाजीराव यांचे कारभारी त्रिंबकजी डेंगळे यांच्यापर्यंतची मराठेशाहीतील काही वाडे आणि घराण्यांचा समावेश या पुस्तकात केला आहे.
उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यातील मराठेशाहीच्या काळातील अनेक प्रसिद्ध-अप्रसिद्ध वाडे आणि घराण्यांचा अभ्यासपूर्ण वेध घेणारा दस्तऐवज म्हणजे ‘ऐतिहासिक वाडे व घराणी’ हे पुस्तक.
मराठेशाहीच्या वेगवेगळ्या काळातील, वेगवेगळ्या शासकांच्या पदरी असणारी, वेगवेगळ्या जाती-धर्माची घराणी यामध्ये आहेत.
सरदार, शास्त्री-पंडित, शाहीर, वतनदार, पाटील-देशमुख, सावकार, आदिवासी समूहाचा नाईक इत्यादी घराण्यांचा आणि त्यांच्या वाड्यांचा माहितीपूर्ण वेध या पुस्तकात घेतला आहे.
वाडे आणि त्यांचे स्थापत्य, त्यांचा संदर्भासहित इतिहास, स्वतः लेखकाने काढलेल्या दीडशेहून अधिक दुर्मिळ वस्तूंचे आणि वाड्यांच्या छायाचित्रांचा समावेश यात आहे.
काही प्रचलित दंतकथा, आख्यायिका, नातेसंबंध आणि परंपरा, वर्तमानातील वाड्यांची स्थिती, मन अस्वस्थ करणारे वास्तव आणि काही रंजक किस्सेही या पुस्तकाचे आकर्षण आहे.

लेखकाविषयी :
सुमित डेंगळे हे युवा लेखक, मुक्तपत्रकार आणि इतिहास अभ्यासक आहेत.

पुण्यातल्या कोथरुडच्या MIT college मधून IT Engineering चे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून Communication and Journalism विषयात मास्टर्स केले आहे.
मराठ्यांच्या इतिहासाचे अभ्यासक असून मोडी लिपीचे ते जाणकार आहेत. भारत इतिहास संशोधक मंडळाचे आजन्म सभासद आहेत. आजवर काही नियतकालिकं, दृकश्राव्य माध्यमं यांच्या माध्यमातून लेखन.
सध्या वडिलोपार्जित व्यवसायसमूहाचं ते काम पाहतात. तसचं मुक्तपत्रकारिता आणि डिजिटल मार्केटिंग क्षेत्रात कार्यरत. लेखनासह संपादनाचा अनुभव.

पुण्यात ज्यांच्या नावाने डेंगळे पुल आहे त्या पेशवाईतल्या सरदार त्रिंबकजी डेंगळे यांच्या घराण्यातील ते असून संगमनेर तालुक्यातील निमगांवजाळी या त्यांच्या मूळ गावात ते त्रिंबकजी डेंगळे यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम आणि डेंगळे वाडा ‘हेरिटेज वॉक’ असे कार्यक्रम आयोजित करतात.

Features

PublisherSakal Prakashan
AuthorSumit Dengale
LanguageMarathi
ISBN978-93-48048-54-7
BindingPaperback
Pages446+8
Publication Year15/03/2025
Dimensions5.5 x 8.5

Reviews

Write a review

Aitihasik Wade Va Gharani

Aitihasik Wade Va Gharani

Customers who bought this product also bought:

  • Bhaktiyog

    'भक्तियोग' हा प्रेम, भक्ती आणि समर्पणाच्या...

    ₹ 140

  • Marco Polo : Europe Ani Asiala Jodnara Sahasi Pravasi

    प्रवास करणं ही कल्पनाच जेव्हा साहसाच्या कक्षेत...

    ₹ 160