BK00895
New product
कर्मवीर भाऊराव पाटील यांची शिक्षणविषयक पत्रे : एक आकलन’ या पुस्तकात डॉ. सुदाम मांडगे यांनी कर्मवीर भाऊराव पाटील लिखित पत्रांचे संशोधन करून कर्मवीरांचे शिक्षणविषयक विचार मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
Warning: Last items in stock!
Availability date:
Karmaveer Bhaurao Patil Yanchi Shikshanvishayak Patre : Ek Aakalan
कर्मवीर भाऊराव पाटील यांची शिक्षणविषयक पत्रे : एक आकलन’ या पुस्तकात डॉ. सुदाम मांडगे यांनी कर्मवीर भाऊराव पाटील लिखित पत्रांचे संशोधन करून कर्मवीरांचे शिक्षणविषयक विचार मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
Recipient :
* Required fields
or Cancel
- स्वावलंबी शिक्षण, चारित्र्य संवर्धन, अस्पृश्यवर्गाचे शिक्षण व उन्नती आणि समग्र रयतेचे शिक्षण या मूल्याधिष्ठित ध्येयांचा वेध घेणारी चिंतनशील मांडणी लेखकाने यात केलेली आहे.
- कर्मवीरांनी आयुष्यभर अंगीकारलेल्या जीवनमूल्यांविषयीची लेखकाने या पुस्तकात प्रसंगपरत्वे नोंदवलेली भाष्ये अतिशय प्रगल्भ व नव्या विचारांना चालना देणारी असून, ही या पुस्तकाची जमेची बाजू आहे.
- कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवनकार्याचा ध्यास घेतलेल्या डॉ. मांडगे यांनी काटेकोर संशोधन आणि सखोल चिंतन यांच्या साहाय्याने भाऊराव पाटील यांचे अलक्षित पैलू वाचकांसमोर आणले आहेत.
- निखळ संशोधकीय प्रेरणा, वैविध्यपूर्ण संदर्भांचा चिकित्सक वेध, वस्तुनिष्ठ तरीही वेधक भाषा यांच्या बळावर हे संशोधनपर पुस्तक चिकित्सक संशोधनाचा नवा वस्तुपाठ मांडते.
लेखकाविषयी :
- डॉ. सुदाम मांडगे हे महाविद्यालयीन शिक्षक असून मूळचे अहिल्यानगर येथील आहेत.
- रसायनशास्त्र शिकवणारे मांडगे शिक्षणशास्त्र या विषयात विद्यावाचस्पतीधारक आहेत.
- शैक्षणिक क्षेत्रात माध्यमिक शिक्षक म्हणून त्यांनी तीन दशके सेवा बजावलेली आहे.
- विविध दैनिकांतून विविध विषयांवर त्यांनी लेखन केले आहे.
- वाचन, लेखन आणि कर्मवीर भाऊराव पाटील हे डॉ. मांडगे यांच्या आस्थेचे विषय आहेत.
Publisher | Sakal Prakashan |
Author | Dr. Sudam Mandage |
Language | Marathi |
ISBN | 978-93-48048-72-1 |
Binding | Paperback |
Pages | 162 |
Publication Year | 25/03/2025 |
Dimensions | 5.5 x 8.5 |