Gharbhar Darwalnara Sugandh

BK01060

New product

Warning: Last items in stock!

₹ 150 tax incl.

More Info

बऱ्याच वेळा बालसाहित्यिक आपल्या बालपणीच्या ऐवजावरच लिहीत राहतात. पण इथे लेखक सतत मुलांच्या सान्निध्यात असल्यामुळे बदलत्या पिढीप्रमाणे त्यांची कथा बदलत गेलेली दिसते.
यातील कथांमधून भाऊ-बहीण, मित्र-मैत्री यांसारख्या नात्यांचा गौरव केला आहे. तर, ‘गर्वाचे घर’मध्ये बालवयात नकळत निर्माण झालेल्या अहंकाराचा प्रभाव लेखक खेळीमेळीने दाखवून देतो. ‘माझ्यासाठी तीच विठाई’मध्ये मुलांमधला उपजत समजूतदारपणा दिसतो. ‘थिरकले चिमुकले पाऊल’मध्ये वारली नृत्याविषयीची आस्था निर्माण होईल असे केले आहे. प्राणिजीवन, भूतदया, निसर्गाकडे बघायचा निकोप दृष्टिकोन याकडेही लेखक चिमुकल्यांचे लक्ष वेधतो.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळत असतानाच वाचनसंस्कृतीच्या ऱ्हासाविषयी सतत बोललं जात असतं. अत्यंत संवेदनशील अशा बालवयात ‘बालवाचक’ निर्माण करायचं महत्त्वाचं काम एकनाथ आव्हाडांच्या हातून होत आहे.

लेखकाविषयी माहिती :
एकनाथ आव्हाड हे बालसाहित्यकार व कथाकथनकार आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत गेली ३१ वर्षे शिक्षक म्हणून कार्यरत. 'कथाकथन तंत्र आणि मंत्र' या कार्यशाळेचे आयोजन.
पुरस्कार
'छंद देई आनंद' या बालकवितासंग्रहास भारत सरकारचा 'साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कार (२०२३).
महाराष्ट्र शासनाचा 'गंमत गाणी' या जोडाक्षर विरहित बालकवितासंग्रहास 'वा.गो.मायदेव' उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार (२००८), 'शब्दांची नवलाई' या त्यांच्या बालकवितासंग्रहास 'बालकवी' उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार (२०२०)
मुंबई महानगरपालिकेचा आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार (२००८),
महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक राज्य पुरस्कार (२०१६)
अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेचा उत्कृष्ट कथानिवेदक पुरस्कार (२००८)

Features

PublisherSakal Prakashan
AuthorEknath Avhad
LanguageMarathi
ISBN978-93-48048-68-4
BindingPaperback
Pages84
Publication Year14/04/2025
Dimensions7 x 9.5

Reviews

Write a review

Gharbhar Darwalnara Sugandh

Gharbhar Darwalnara Sugandh

Customers who bought this product also bought: