Manshuddhichi Perni

BK01043

New product

₹ 150 tax incl.

-25%

₹ 200 tax incl.

More Info

महाराष्ट्रातील वारकरी संतांनी अध्यात्मसाधनेत मनावर संयम मिळवण्यावर महत्त्वपूर्ण भर दिला. देवाच्या प्राप्तीसाठी आणि आत्मिक शांतीसाठी मनावरील नियमन महत्त्वाचे असल्याचे आपल्या अभंगांतून आणि ओवीतून त्यांनी वारंवार सांगितले. संतांची हीच वैचारिक परंपरा पुढे घेऊन जाण्याचे महत्त्वाचे काम डॉ. इंद्रजीत देशमुख (काकाजी) करत आहेत.


प्रस्तुत मनशुद्धीची पेरणी या पुस्तकात काकाजींनी ‘मन माझे चपळ’ या मनाच्या प्राथमिक स्तरापासून ते ‘मन हे मीचि करी’ या मनाच्या अंतिम पायरीवर पोहोचण्यासाठी कराव्या लागणाऱ्या विविध प्रयोगांचा समावेश केला आहे. हे सर्व प्रयोग अर्थातच संतवचनांवर आधारित आहेत. संत ज्ञानेश्वरांपासून ते संत कबीर, संत तुकाराम या संत मांदियाळीबरोबरच मिल्टन, शेक्सपियर या पाश्चात्त्य अभ्यासकांचे अनेक दाखले आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळतात. संतांच्या मार्गाने, मन या साधनाने याच शाश्वत आनंदाचा काकाजींनी घेतलेला शोध वाचण्यासारखा आहे.

लेखकाविषयी माहिती :

इंद्रजीत दत्ताजीराव देशमुख हे माजी प्रशासकीय अधिकारी आहेत.
प्रशासकीय सेवा : महाराष्ट्र लोकसेवा आयोग परिक्षेतून गटविकास अधिकारी पदावर निवड, उपायुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी, उपायुक्त, प्रशासकीय सेवेत निस्वार्थी भावाने जनसामान्यांच्या समस्या सोडवत लोककल्याणासाठी प्रभावी कार्य.

सामाजिक कार्य:
समाजजीवनातील न्यूनता ओळखून, अवघ्यांचे आयुष्य आनंदी- मंगलमय करण्याच्या पवित्र भावाने, ‘शिवम आध्यात्मिक व सांस्कृतिक विकास प्रतिष्ठान घारेवाडी’(ता.कराड,जि.सातारा, महाराष्ट्र) ची स्थापना.

शिवम प्रतिष्ठानमार्फत व्यापक कार्य:
बालसंस्कार शिबिर, युवा हृदय संमेलन, शौर्यवर्धिनी सखी संमेलन, गुरूजन हृदय संमेलन, शेतकरी हृदय संमेलन उपक्रम. दुष्काळी भागात जलसंवर्धन व कृषिसंवर्धनसाठी 'मायभू सेवा यात्रा' विशेष कार्य.
स्वामी प्रणवानंद सद्गुरूंकडून अनुग्रह व कृपाप्रसाद प्राप्त झाल्यानंतर एक ध्येयवादी जीवन.

पुरस्कार : अक्षर मानव पुरस्कार, नेताजी सुभाषचंद्र बोस युवा गौरव पुरस्कार, वाकप्रभू पुरस्कार

Reviews

Write a review

Manshuddhichi Perni

Manshuddhichi Perni