BK01022
New product
‘छंदातून व्यवसाय’ उभारून स्वत:ची ओळख निर्माण केलेल्या एकवीस नवउद्यमींच्या वाटचालीचा आटोपशीर आढावा रश्मि हृषिकेश गोडसे आणि प्रा. डॉ. सुभाष भावे यांनी ‘संकल्पपूर्ती - छंदातून व्यवसायाकडे’ या पुस्तकात घेतला आहे.
Warning: Last items in stock!
Availability date:
Sankalpapoorti : Chhandatoon Vyavasayakade
‘छंदातून व्यवसाय’ उभारून स्वत:ची ओळख निर्माण केलेल्या एकवीस नवउद्यमींच्या वाटचालीचा आटोपशीर आढावा रश्मि हृषिकेश गोडसे आणि प्रा. डॉ. सुभाष भावे यांनी ‘संकल्पपूर्ती - छंदातून व्यवसायाकडे’ या पुस्तकात घेतला आहे.
Recipient :
* Required fields
or Cancel
लेखकांविषयी :
रश्मि हृषिकेश गोडसे या एम. कॉम. पदवीधर आहेत, शिवाय त्यांनी पुण्याच्या सिम्बॉयसिस या शिक्षण संस्थेतून ‘डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ’ पूर्ण केला आहे.
शालेय जीवनात विविध वक्तृत्व स्पर्धांमधून भाग घेऊन त्यांनी अनेक पारितोषिके मिळवली आहेत.
पुण्यातील एका नामांकित खासगी कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये त्यांनी अनेक वर्षे लेखापाल म्हणून यशस्वीपणे जबाबदारी निभावली आहे.
कोव्हिड काळामध्ये संस्थेतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी अनेक छंद जोपासले. ज्यामध्ये क्रोशेवर्क, कॅण्डल मेकिंग, वॉटरफॉल मेकिंग यांचा समावेश होता.
त्यामुळे विविध छंदांवर आधारलेल्या त्यांच्या या प्रथम पुस्तकाच्या संपादनाचे काम त्यांनी मनापासून आणि आवडीने केले आहे.
प्रा. डॉ. सुभाष भावे यांनी एम.ए. (अर्थशास्त्र) आणि एल.एल.बी., एम.बी.ए. या पदव्या संपादन केल्या आहेत.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आय.आय.एम.) अहमदाबाद या अग्रगण्य संस्थेचे ते पहिल्या बॅचचे विद्यार्थी आहेत.
१९६६ मध्ये एम.बी.ए. पूर्ण केल्यानंतर त्यांनी अनेक वर्षे स्वतःचा व्यवसाय केला.
१९८६ ते १९९९ पर्यंत त्यांनी ‘ना. ग. नारळकर इन्स्टिट्यूट ऑफ करिअर डेव्हलपमेंट अँड रिसर्च’ या संस्थेत संचालक म्हणून काम केले.
आजपर्यंत त्यांची विविध विषयांवरील बारा पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ‘श्री हनुमान चालीसा’ या त्यांच्या पुस्तकाचा इंग्रजी भाषेत अनुवाद झाला आहे, तर कानडी व गुजराथी भाषेमध्ये अनुवादाचे काम सध्या सुरू आहे आणि लवकरच ही पुस्तके प्रकाशित होतील.
Publisher | Sakal Prakashan |
Author | Rashmi Hrushikesh Godse, Prof. Dr. Subhash Waman Bhave |
Language | Marathi |
ISBN | 978-93-49487-77-2 |
Binding | Paperback |
Pages | 120 |
Publication Year | 30/04/2025 |
Dimensions | 5.5 x 8.5 |