Brahmandnayak

BK00842

New product

₹ 699 tax incl.

More Info

अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ महाराजांना भक्तगण 'ब्रह्मांडनायक' म्हणून ओळखतात. 'भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे' असे आशीर्वचन देणार्‍या स्वामी समर्थांचे जीवनकार्य अलौकिक आहे. जगाच्या कल्याणार्थ भूमीवर अवतरलेला हा ईश्वरी अवतार! त्यांचे पूर्वावतार, स्वामी समर्थ अवतारातील जीवनकार्य, त्यांच्या लीला, भक्तजनांवर त्यांनी केलेला कृपावर्षाव, त्यांचा शिष्यपरिवार, त्यांची समाधी लीला व समाधीनंतरही त्यांचे अस्तित्व या सर्वांचा विस्तृत आणि सप्रमाण आढावा या चरित्रग्रंथात घेतला आहे. त्यामुळे भाविक भक्तांबरोबरच साधक व चिकित्सक अभ्यासकांनाही हा ग्रंथ निश्चितच वाचनीय व उपयुक्त वाटेल.


लेखकाविषयी : डाॅ. यशवंत पाटील यांना महाविद्यालयातील अध्यापनाचा दीर्घानुभव आहे. स्वामी समर्थांवर ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून त्यांनी पीएच.डी. प्राप्त केली आहे. विविध पाक्षिके, साप्ताहिके, व मासिकांमध्ये तसेच वर्तमानपत्रांत त्यांनी स्तंभलेखन केले. अनेक व्याख्यानमालांमध्ये वक्ते म्हणून ते सहभागी असतात. संतसाहित्य हा त्यांचा अभ्यासाचा व चिंतनाचा विषय असल्याने त्यावर ते व्याख्याने देतात. तालुका व जिल्हास्तरीय विविध पुरस्कारांचे ते मानकरी आहेत.

Features

PublisherSakal Prakashan
AuthorDr. Yashwant Patil
LanguageMarathi
ISBN978-93-49487-42-0
BindingPaperback
Pages568
Publication Year16/05/2025
Dimensions5.5 x 8.5

Reviews

Write a review

Brahmandnayak

Brahmandnayak