Nisarga Ani Manus

BK01094

New product

₹ 225 tax incl.

More Info

पाणी व्यवस्थापन आणि जल संधारणाची मूलतत्त्वे कोणती? ती आचरणात कशी आणता येतील?
भूजल पातळी वाढवण्यासाठी काय करायचे? पाण्याचा योग्य वापर म्हणजे नेमके काय?
अशा प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी डॉ. राजेंद्र सिंह 'तरुण भारत संघ' या संस्थेद्वारे ५० वर्षं काम करत आहेत.

लोकशिक्षण आणि लोकसहभाग, पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक तंत्रे यांची सांगड घालून
अथक प्रयत्नांद्वारे रखरखीत, शुष्क प्रदेशात त्यांनी पाणी आणले; हिरवाई फुलवली.
चंबळच्या खोऱ्यातील अनेकांना आयुष्य नव्याने जगण्याची संधी मिळवून दिली.
अनेक कुटुंबांची आयुष्ये समृद्ध केली.

हे सारे सांगणारे वाचनीय, प्रेरणादायी आणि संग्राह्य पुस्तक निसर्ग आणि माणूस : जल स्वराज्यातून जल समृद्धीकडे

लेखकाविषयी :
डॉ. राजेंद्र सिंह राणा
जलसंधारण क्षेत्रातील तज्ज्ञ असणारे डॉ. राजेंद्र सिंह राणा 'भारताचे जलपुरुष' म्हणून ओळखले जातात.
जलसुरक्षा मिळवण्यासाठी आवश्यक जलसाक्षरता रुजवण्यासाठी राजेंद्र सिंह पाच दशकांहून अधिक काळ कार्यरत आहेत.
पाणी जपण्याच्या-राखण्याच्या-वाढवण्याच्या 'जोहड'सारख्या स्थानिक जलसंधारण साधनांचे, तंत्रांचे पुनरुज्जीवन करून राजस्थानात हिरवळ फुलवली; वर्षभर पाण्याची सोय करण्यात यशस्वी.
'रॅमन मॅगसेसे पुरस्कार', जल व्यवस्थापन क्षेत्रातील नोबेल समजले जाणारे 'स्टॉकहोम वॉटर प्राइज', अशा अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित

Features

PublisherSakal Prakashan
AuthorDr. Rajendra Singh
LanguageMarathi
ISBN978-93-49487-70-3
BindingPaperback
Pages132+8
Publication Year30/05/2025
Dimensions5.5 x 8.5

Reviews

Write a review

Nisarga Ani Manus

Nisarga Ani Manus