Kahihi Hou Shakata

BK00981

New product

₹ 499 tax incl.

More Info

अपयशाची आवर्तनं आणि त्यातून आलेले निराशेचे भोवरे यांतून  तरून गेल्या नंतर,  यशांच्या विविध शिखरां पर्यंत झालेल्या कोणा एकाच्या खडतर प्रवासाची ही सुरस गाथा आहे.
शालांत परिक्षेची अटक ओलांडताना धडपडलेल्याला नायकाला पुढे  आंतरराष्ट्रीय पातळीवरील विद्यावृत्त्या प्राप्त होणं, अशुद्ध भाषेचा ठपका  मिरवणाऱ्या त्याच्या हातून राज्य पुरस्कार प्राप्त साहित्य निर्मिती होणं, अशा कादंबरीतच शोभणाऱ्या पण खऱ्याखुऱ्या घटनांचं हे प्रांजळ निवेदन म्हणजे ही आत्मचारित्रात्मक कादंबरी होय.
मुळातून स्वतःची घडण करणाऱ्या आणि स्वतःतला आशावाद टिकवून ठेवणाऱ्या माणसाची ही एक वाचनीय गोष्ट आहे.

लेखकाविषयी :
अनिल अप्पासाहेब परुळेकर हे सध्या गोव्यात मडगाव इथं राहत असून चिफ इंजिनियर म्हणून निवृत्त झाले आहेत. वाचन आणि लेखन ते सातत्याने करतात.
त्यांनी कोंकणी आणि मराठी भाषेतून अनेक पुस्तके लिहिली असून, गोवा कोंकणी अकादमी पुरस्कार, मध्यप्रदेश राज्य पुरस्कार, नाथ माधव साहित्य पुरस्कार असे अनेक मानाचे पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.
वनराईचा लढा, वाहतं पाणी, परिघापार, अडीच पानांची बखर, पिढीजात यांसारखी दर्जेदार पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.

Features

PublisherSakal Prakashan
AuthorAnil Appasaheb Parulekar
LanguageMarathi
ISBN978-93-49487-18-5
BindingPaperback
Pages312
Publication Year04/06/2025
Dimensions5.5 x 8.5

Reviews

Write a review

Kahihi Hou Shakata

Kahihi Hou Shakata