Dhyanswasthya : Nirogi Jeewanasathi Dhyangatha

BK01041

New product

Warning: Last items in stock!

₹ 270 tax incl.

More Info

योगशास्त्रातील ध्यानाचा संबंध फक्त अध्यात्माशी आहे, वैद्यकीय आणि वैज्ञानिक निकषांवर ते टिकणार नाही असा चुकीचा समज पसरवला जात असताना ध्यानावर होत असलेल्या जागतिक संशोधनाकडे मनोज पटवर्धन यांनी लक्ष वेधले आहे. चांगले छंद ही ध्यानाची पूर्वतयारी आहे याची जाणीव करून देत असताना ‘काहीही न करणे म्हणजे ध्यान’, या ध्यानाच्या अतिशय महत्त्वाच्या व्याख्येची ओळख त्यांनी करून दिली आहे. ‘योगनिद्रा’ हे योगशास्त्राने दिलेले एक अद्भुत वरदान आहे. या अतिशय प्रभावी, योग्य प्रक्रियेविषयी त्यांनी सविस्तर लिहिले आहे. त्याच्या पूर्वतयारी पासून ते योगनिद्रेतून हळुवारपणे बाहेर येण्याच्या स्थितीपर्यंत सर्वच पायऱ्या त्यांनी छान समजावून सांगितल्या आहेत.
मनोज पटवर्धन यांनी आजवर केलेली योगसाधना, त्यांचे चौफेर वाचन, सखोल अभ्यास या साऱ्याला असलेली मननाची आणि चिंतनाची जोड यांमुळे त्यांच्या लेखनाला एक वेगळे परिमाण लाभले आहे. साधी सोपी भाषा, अवघड विषय सोपा करून सांगण्याची हातोटी आणि मुख्य म्हणजे विषयाबाबतची तळमळ यामुळे हे पुस्तक वाचनीय झाले आहे.

लेखकाविषयी माहिती :
लेखक मनोज पटवर्धन हे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील ज्येष्ठ, दीर्घानुभवी योगतज्ज्ञ आहेत. ते मेकॅनिकल इंजिनिअर असून किर्लोस्कर उद्योगसमूहात ते ज्येष्ठ पदावर कार्यरत होते. मनो-वर्धन योगसंस्थेचे संस्थापक, संचालक आहेत. मनो-वर्धन योगसंस्थेच्या माध्यमातून ते गेली २८ वर्षे भव्य प्रमाणात सामुहिक सूर्यनमस्कार, योगासन स्पर्धांचे आयोजन करतात. त्यासाठी लंडन बुक ऑफ रेकॉर्ड्सतर्फे विश्वविक्रम पुरस्कार.

Features

PublisherSakal Prakashan
AuthorManoj Patwardhan
LanguageMarathi
ISBN9789349487055
BindingPaperback
Pages194
Publication Year16/06/2025
Dimensions5.5 x 8.5

Reviews

Write a review

Dhyanswasthya : Nirogi Jeewanasathi Dhyangatha

Dhyanswasthya : Nirogi Jeewanasathi Dhyangatha

Customers who bought this product also bought: