BK01039
New product
Warning: Last items in stock!
Availability date:
Dhasudi : Aswastha Manatil Goshti
Recipient :
* Required fields
or Cancel
एकाच विषयावर दोन अडीचशे पाने लिहावीत इतक्या गहन अर्थाचे विषय धसुडी या पुस्तकात मांडले आहेत. सध्याच्या धावपळीच्या जगात वाचकांकडे वाचनासाठीचा असलेला वेळ लक्षात घेता अवघ्या एका पानात एका विषयाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. या पुस्तकातून तुम्हाला चाळीसहून अधिक ज्वलंत विषयांवरील वास्तववादी विचार वाचायला मिळणार आहेत. आपल्या दैनंदिन आयुष्यात प्रेरणा देणारे महापुरुष व महान स्त्रियांच्या चरित्रालासुद्धा सद्यस्थितीशी जोडून त्यातून नव्या पिढीला प्रेरणा देण्याचा प्रयत्न यातून केला गेला आहे. धसुडी हे पुस्तक सर्व वयोगटातील लोकांना पथदर्शी ठरणार आहे. विद्यार्थी, युवक-युवती, नोकरदार, कामगार, शिक्षक, महिला, वृद्ध, शेतकरी, उद्योजक या सर्वांच्या संबंधीच्या लेखांनी धसुडी लेखसंग्रह समृद्ध झाला आहे.
या धसुड्या वाचताना हजारो श्रोत्यांना या निमित्ताने विशाल गरड यांच्या लिखाणाचा एक आगळावेगळा अनुभव मिळेल. शिवाय या धसुड्या सर्वांना रुचेल आणि रुजेल अशा असल्याने सर्वांच्या हृदयाचा ठाव घेण्याची क्षमता त्यांच्यात आहे.
लेखकाविषयी माहिती :
प्रा.विशाल गरड हे लोकव्याख्यानकार, वक्ता, लेखक, कवी, चित्रकार, कॅलिग्राफर, दिग्दर्शक आहेत. त्यांची सहा पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांसह विद्यार्थ्यांसाठी अनेक नामांकित शैक्षणिक संस्थांत आणि कर्मचाऱ्यांसाठी कंपनीत संबंध महाराष्ट्रासह परराज्यात आजवर तीन हजारांहून अधिक प्रेरणादाई व्याख्याने दिली आहेत. 'दैना', 'बुचाड' आणि `तोड’ अशा तीन लघुचित्रपटांचे लेखन, निर्मिती आणि दिग्दर्शन त्यांनी केले आहे.
Publisher | Sakal Prakashan |
Author | Prof. Vishal Garad |
Language | Marathi |
ISBN | 978-93-48048-96-7 |
Binding | Paperback |
Pages | 166 |
Publication Year | 26/06/2025 |
Dimensions | 5.5 x 8.5 |