Leader as a Coach : Prashikshakachya Bhumiketoon Netrutva

BK01109

New product

Warning: Last items in stock!

₹ 290 tax incl.

More Info

आपले नेतृत्व, आपली टीम, आणि आपले भविष्य कसे सक्षम करायचे? यांविषयीचे योग्य मार्गदर्शन म्हणजे 'लीडर अॅज ए कोच'
आजच्या झपाट्याने बदलणाऱ्या जगात प्रभावी नेतृत्व म्हणजे केवळ अधिकार गाजवणे नव्हे, तर आपल्या टीमला सक्षम करणे होय! त्यांच्या प्रतिभेला पोषक वातावरण देणे आणि त्यांच्या सहकार्याची संस्कृती निर्माण करणे, यांविषयी मार्गदर्शन
हे पुस्तक नेतृत्वाचा एक नवाच दृष्टिकोन मांडते. प्रेरणादायी कोच कसे बनावे, टीमचे मनोबल कसे वाढवावे आणि उच्च कार्यक्षमतेसाठी मार्गदर्शन कसे करावे, यावर भर दिला आहे.
सुलभ आणि वाचनीय पुस्तकात प्रत्येकासाठी योग्य ठरणारे नेतृत्व मार्गदर्शन आहे. सर्वसमावेशकता आणि सहभागाच्या माध्यमातून नवोपक्रम कसे साध्य होतात, याविषयी विवेचन!
आव्हानांना संधीमध्ये कसे रूपांतरित करता येते आणि यशस्वी व्यूव्हरचना कशी करता येते, हे या पुस्तकातून समजते.
टीमला प्रेरित करणाऱ्या कोचिंग कौशल्यांचा विकास कसा करायचा, शाश्वत विकासाचा पाया कसा घालायचा आणि दीर्घकालीन यश सुनिश्चित कसे करायचे, हे शिकण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.
तुम्ही अनुभवी व्यावसायिक असाल किंवा नेतृत्व क्षेत्रात नवे पाऊल टाकत असाल, हे पुस्तक तुम्हाला उच्च-कार्यक्षम टीम तयार करण्यात आणि आजच्या काळात आवश्यक असलेल्या आधुनिक नेतृत्वशैलीत रूपांतरित करण्यात मार्गदर्शक ठरेल.


लेखक परिचय : जी. एस. ग्रेवाल यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात तरुण अभियंता प्रशिक्षणार्थी म्हणून केली आणि पुढे 'कुबोता इंडिया' या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालकपद भूषवले. उद्योगक्षेत्रात ३३ वर्षांच्या अनुभवात त्यांनी अनेक भारतीय आणि जपानी नेतृत्वाखाली काम केले आहे. ते कोचिंग-आधारित नेतृत्वशैलीचे पुरस्कर्ते आहेत. खरे नेतृत्व विनम्र असते आणि सतत शिकण्यास तयार असतात, असे त्यांचा विश्वास आहे. त्यांनी 'कुबोता इंडिया'मध्ये परस्पर सन्मान आणि विश्वास यांची संस्कृती निर्माण केली असून भारतीय व जपानी सांस्कृतिक मूल्यांचा उत्तम समन्वय घडवला आहे.

Features

PublisherSakal Prakashan
AuthorG. S. Grewal
LanguageMarathi
ISBN978-93-49487-79-6
BindingPaperback
Pages197
Publication Year27/06/2025
Dimensions5.5 x 8.5

Reviews

Write a review

Leader as a Coach : Prashikshakachya Bhumiketoon Netrutva

Leader as a Coach : Prashikshakachya Bhumiketoon Netrutva